Crime News : कर्नाटकच्या रायचूरच्या सिरवार तालुक्यातील होकराणी गावात गुरुवारी एका महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. संबंधित प्रकरणात महिलेवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा मृत महिलेच्या नवऱ्याने संशय व्यक्त केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली, दरम्यान आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : शनी नक्षत्र बदलणार, दसऱ्यापूर्वी 'या' राशीचं भलं होणार
शौचासाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत
घडलेल्या घटनेनुसार, शौचालयास महिला शौचासाठी गेली असता, दुसऱ्याच दिवशी गावात एका विहिरीत मृतदेह आढळून आला होता. महिलेच्या तक्रारीच्या आधारे तरुणीसोबत लैंगिक अत्याचार आणि हत्या करण्यात आली. संबंधित प्रकरणात संशयित आरोपींची गुंड्या आणि महंतेश (वय 22), के. वीरेश (वय 23) आणि मुंडरागी बसवराज (वय 45) अशी ओळख समोर आली.
तीन आरोपींना अटक
सर्किल पोलीस इंस्पेक्टर एम. शशिकांत यांनी सांगितलं की, यापैकी तिघांना ताब्यात घेत न्यायालयीन कोठडीत पाठवले. मृत महिलेची 22 वर्षीय महिला अशी ओळख समोर आली. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, महिला ही बुधवारी सायंकाळी शौचासाठी गेली होती, मात्र ती परतली नाही. बऱ्याच वेळानंतर गुरूवारी सकाळी कुटुंबीयांना त्यांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आलेला दिसून आला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.
हे ही वाचा : अनेकांनी समजावलं, तरी पोरगा गेला, सोबत आईबापही गेले; खवड्या डोंगरावर काय घडलं?
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना संशय व्यक्त करत सांगितलं की, हल्लेखोरांनी हल्ले करून मृतदेह विहिरीत फेकून दिला, या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT












