अनेकांनी समजावलं, तरी पोरगा गेला, सोबत आईबापही गेले; खवड्या डोंगरावर काय घडलं?

मुंबई तक

देवळालीचा हा 18 वर्षाचा तरुण . डोंगराच्या कड्यावर तो आत्महत्या करण्यासाठी उभा राहिला. लोकांनी पाहिलं. सकाळी 10 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तो ऐकायला तयार नव्हता.

ADVERTISEMENT

Sambhajinagar Tragedy
Sambhajinagar Tragedy
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अनेकांनी समजावलं, तरी पोरगा गेला, सोबत आईबापही गेले

point

खवड्या डोंगरावर काय घडलं?

Sambhajinagar Tragedy : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर एक अत्यंत हृदयद्रावक आणि थरारक घटना घडली आहे. कौटुंबिक अडचणींमुळे नैराश्यात गेलेल्या 18 वर्षीय तरुणासह त्याच्या आई-वडिलांनी डोंगरावरून 300 फूट खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. कुणाल चांदवडे (वय 18), त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे अशी या मृत दुर्दैवी एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण संभाजीनगरसह आसपासच्या परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात असून समाजमन सुन्न झाले आहे.

तीन तास थरार

मिळालेल्या माहितीनुसार, देवळाई परिसरात राहणारा कुणाल चांदवडे हा तरुण काही कौटुंबिक कारणांमुळे मानसिक तणावात होता. तो सकाळी दहाच्या सुमारास घरातून निघून वाळूज येथील 300 फूट उंच खवड्या डोंगराच्या कड्यावर जाऊन उभा राहिला. मुलगा टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे दिसताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मागोमाग कुणालचे आई-वडीलही तिथे पोहोचले. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल तीन तास स्थानिक नागरिक, पोलीस आणि त्याच्या आईने त्याला समजावण्याचा अतोनात प्रयत्न केला.

हे ही वाचा : अल्पवयीन मुलीवर बापाचा वारंवार अत्याचार; दोन वेळा गर्भधारणा, नवजात बाळाची विक्री

बाप-केल कोसळले दरीत

डोंगराच्या कड्यावर उभा असलेला कुणाल कुणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. "तू सुशिक्षित आहेस, कुटुंबाकडे बघ, तुझे भविष्य बाकी आहे," अशा अनेक विनंत्या उपस्थितांनी व आईने त्याला केल्या. मात्र, तो वारंवार जागा बदलत आत्महत्या करण्यावर ठाम राहिला. दुपारी एकच्या सुमारास खाली असलेले त्याचे वडील मुरलीधर हेसुद्धा डोंगराच्या कड्यावर आले. त्यांनी कुणालला पकडून सुरक्षित मागे खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने या झटापटीत दोघांचाही तोल गेला आणि बाप-लेक थेट 300 फूट खोल दरीत कोसळले.

हे ही वाचा : मुंबईच्या दोन डॉक्टरांचा पाकिस्तानला पुळका, 'गुपित' कनेक्शनची भन्नाट कहाणी!

आईनेही घेतली उडी

आपल्या डोळ्यांदेखत पती आणि तरुण मुलगा दरीत कोसळल्याचे पाहताच, आघाताने हादरलेल्या आई संगीता यांनीही क्षणाचाही विचार न करता त्याच कड्यावरून खाली दरीत उडी घेतली. काही क्षणांतच घडलेल्या या भयंकर थरारात तिघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठवले आहेत. अवघ्या काही फुटांच्या अंतरावरून हा सर्व प्रकार पाहणारे प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिक या धक्कादायक घटनेमुळे दुःखात आहेत.