मोबाईल घेतला, अंगावर उकळते पाणी ओतले अन् खोलीत डांबले; 23 वर्षीय तरुणीसोबत घडलं भयंकर

मुंबई तक

• 01:31 PM • 22 Aug 2026

शेजारी राहणाऱ्या दांपत्याने एका 23 वर्षीय तरुणीवर उकळते पाणी ओतले. इतकंच नव्हे तर आरोपी दांपत्याने तिला खोलीत डांबून ठेवले आणि तिचा मोबाईलही काढून घेतला. हरियाणातील ही घटना आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मोबाईल घेतला, अंगावर उकळते पाणी ओतले अन् खोलीत डांबले

point

23 वर्षीय तरुणीसोबत घडलं भयंकर

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या वादातून आणि कौटुंबिक कलहातून शेजारी राहणाऱ्या दांपत्याने एका 23 वर्षीय तरुणीवर उकळते पाणी ओतले. इतकंच नव्हे तर आरोपी दांपत्याने तिला वैद्यकीय उपचार मिळू नयेत म्हणून खोलीत डांबून ठेवले आणि तिचा मोबाईलही काढून घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीची सुटका केली. प्रीती असे या घटनेतील पीडित तरुणीचे नाव असून या हल्ल्यात ती 50 टक्क्यांहून अधिक भाजली आहे.  हरियाणाच्या फरीदाबादमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

नवऱ्यापासून वेगळी, शेजाऱ्यांशी जवळीक

पीडित प्रीती ही मूळची बिहारमधील शाहापूर येथील रहिवासी असून दोन वर्षांपूर्वी तिचा रोहित नावाच्या तरुणाशी विवाह झाला होता. मात्र, पतीसोबत झालेल्या सततच्या भांडणांमुळे ती दोन महिन्यांपूर्वी त्याच्यापासून वेगळी झाली होती. या काळात तिची ओळख शेजारी राहणाऱ्या धर्मेंद्र आणि ललिता या दांपत्याशी झाली आणि ती त्यांच्या घरी राहू लागली. याचदरम्यान 16 ऑगस्ट रोजी पहाटे 4 च्या सुमारास ही भीषण घटना घडली.

हे ही वाचा : Reshma Pardhi Interview : रील्स केल्यानं निलंबन, मग कारवाई मागे घेतली, काय घडलं?

तीन लाख रुपयांमध्ये विक्री?

हल्ल्यानंतर गंभीर भाजलेल्या प्रीतीला उपचारासाठी बाहेर पडू दिले गेले नाही. पोलिसांनी तिची सुटका केल्यानंतर प्रथम तिला रुग्णालयात दाखल केले, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्या छातीवर आणि हातावर गंभीर स्वरूपाचे फोड आले आहेत. दरम्यान, प्रीतीला तीन लाख रुपयांच्या बदल्यात एका वृद्धाशी विकण्याचा आरोपींचा प्रयत्न होता, असा कोणताही उल्लेख तक्रारीत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : पुणे : 'तुझे विवस्त्र फोटो पाठव...' अध्यात्माच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, इन्फ्लुएन्सर ताब्यात

बायको अटकेत, नवरा फरार

या प्रकरणी आरोपी धर्मेंद्र आणि ललिता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करत पोलिसांनी आरोपी ललिताला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे, तर तिचा पती धर्मेंद्र सध्या पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित तरुणीची प्रकृती स्थिर झाल्यावर तिचा अधिकृत जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांचे पथक दिल्लीतील रुग्णालयात भेट देणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.