होमवर्क केला नाही म्हणून शिक्षकेने कानशिलात लगावली, चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई तक

• 07:33 AM • 23 Aug 2026

visakhapatnam news : विशाखापट्टणममध्ये शिक्षकाने गृहपाठ पूर्ण न केल्याने पाच वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर विद्यार्थ्याची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

visakhapatnam news

visakhapatnam news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

होमवर्क केला नाही म्हणून शिक्षकेने कानशिलात लगावली

point

चिमुकल्याचा मृत्यू, नातेवाईकांचे आरोप

visakhapatnam news : विशाखापट्टणममधील कोठा रोड परिसरातील एका खासगी शाळेत गुरुवारी पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे शिक्षिकेने विद्यार्थ्याला चापट मारल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. या घटनेनंतर मुलाच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी शाळेबाहेर आंदोलन केले. शिक्षकाच्या मारहाणीमुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांनी शाळा व्यवस्थापन आणि संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. ही शाळा वन टाऊन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते.

हे वाचलं का?

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : कड्यावरून मुलाची आत्महत्या, वाचवताना वडिलांचा मृत्यू; पाठोपाठ आईनेही मारली उडी..VIDEO

गृहपाठ पूर्ण नसल्याने कानशि‍लात लगावली अन् प्रणय कोसळला 

मृत विद्यार्थ्याचे नाव टी. प्रणय तेज असून तो कृष्ण प्रसाद आणि साई लक्ष्मी यांचा मुलगा होता. कृष्ण प्रसाद हे स्वयंपाकी असून साई लक्ष्मी गृहिणी आहेत. पालकांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी प्रणयने काही गृहपाठ पूर्ण केला नव्हता. त्यामुळे तो शाळेत जाण्यास तयार नव्हता. अखेर तो शाळेत गेला. मात्र, त्याचा मूड काहीसा खराब होता. वर्गातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिक्षिका विद्यार्थ्यांना एक-एक करून गृहपाठ तपासण्यासाठी बोलावत असल्याचे दिसत असल्याचे सांगण्यात आले. प्रणयने कोरी स्लेट दाखवल्यानंतर शिक्षिकेने त्याला आपल्याकडे ओढले, त्याचा शर्ट उघडला आणि वर्गात त्याला कानशिलात मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रणय वर्गातच कोसळला.

हेही वाचा : हिंगोली : बिस्किस्टाचे अमिष दाखवून 13 वर्षीय भोळसर मुलीवर सामुहिक बलात्कार, चौघांना अटक

पालक आणि नातेवाईकांचे शाळेत आंदोलन

प्रणयला तातडीने विशाखापट्टणम येथील केजी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना सकाळी सुमारे 11 वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शाळा व्यवस्थापनाने दुपारी 12.50 वाजता प्रणयच्या पालकांना माहिती दिल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पालक आणि नातेवाईकांनी शाळेत आंदोलन केले. त्यांनी शाळा व्यवस्थापन आणि या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हा शिक्षण अधिकारी प्रेम कुमार आणि वन टाऊन पोलीस निरीक्षक वर प्रसाद यांनी शाळेला भेट देऊन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली. प्रेम कुमार यांनी प्राथमिक अहवाल सरकारकडे सादर करण्यात आल्याचे सांगितले. पुढील कारवाई लवकरच केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी प्रणयच्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आयटी आणि शिक्षण मंत्री नारा लोकेश यांनी या घटनेबद्दल धक्का व्यक्त केला आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात, तसेच शाळा व्यवस्थापनाविरोधात सरकार कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले. तसेच पीडित मुलाच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.