Crime News : गाझियाबाद परिसरात शनिवारी (22 ऑगस्ट) पहाटे एक अत्यंत थरारक घटना घडली. एका मटण व्यापाऱ्याने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीची आणि 15 वर्षांच्या मुलीची मटण कापण्याच्या धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या केली. या जीवघेण्या हल्ल्यात त्याची दुसरी मुलगीही गंभीर जखमी झाली असून, तिने प्रसंगावधान राखून पळ काढल्यामुळे तिचा जीव वाचला आहे.
ADVERTISEMENT
बायको अन् मुलीचा चिरला गळा
मोहम्मद राजा अंसारी असे आरोपीचे नाव असून तो मूळचा बिहारमधील अररिया येथील रहिवाशी आहे. तो लोकप्रिय विहारमधील गल्ली नंबर ३ मधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आपल्या कुटुंबासह राहत होता. शुक्रवारी रात्री आरोपीचा त्याची पत्नी बेबी तबस्सुम हिच्याशी जोरदार वाद झाला होता. हा वाद मिटल्यानंतर सर्वजण झोपी गेले. मात्र, पहाटेच्या सुमारास आरोपीने घरातील धारदार शस्त्र काढून आधी पत्नीचा आणि नंतर 15 वर्षांच्या सना तबस्सुम या मुलीचा गळा चिरून खून केला.
हे ही वाचा : बारामती : रोहित पवारांच्या पीएच्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
लहान मुलगी कशी वाचली?
आई आणि बहिणीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून लहान मुलगी जागी झाली असता, आरोपीने तिच्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला. ती तिथून पळू लागताच आरोपीने तिच्या दिशेने शस्त्र फेकून मारले, जे तिच्या मांडीला लागून ती जखमी झाली. या परिस्थितीतही तिने घरातून बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला आणि आरडाओरडा केला. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात मुलासह वडिलांची 300 फूट खोल दरीत उडी, आईनं पाहिलं अन्..
आरोपीची चौकशी सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री 12.15 वाजता पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, आरोपी राजा अंसारी याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.
ADVERTISEMENT












