16 वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागलं अन् भयंकर प्रकरण समोर; आजोबावर का दाखल केला गुन्हा?

मुंबई तक

• 08:53 AM • 23 Aug 2026

हाथरसमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 70 वर्षीय व्यक्तीवर त्याच्या 16 वर्षीय नातीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोटदुखीची तक्रार घेऊन ती तरुणी डॉक्टरांकडे गेली होती.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

16 वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागलं अन् भयंकर प्रकरण समोर

point

आजोबावर का दाखल केला गुन्हा?

Crime News : कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणारी आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सिकंदराराऊ परिसरातील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या ७० वर्षीय आजोबांनीच वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी आजोबांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथीसल ही घटना आहे.

हे वाचलं का?

आईचे निधन, आजोबांनी केला अत्याचार

पीडित मुलीच्या आईचे आधीच निधन झाले असून ती घरात तिचे वडील आणि आजोबांसोबत राहत होती. सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी ती आपल्या नातेवाईकांच्या घरून परतली होती. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 20 जून रोजी आजोबांनी तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर जेव्हा तिचे वडील कामासाठी घराबाहेर जात असत आणि ती घरात एकटी असायची, तेव्हा आजोबा तिच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिचे लैंगिक शोषण करत होते.

हे ही वाचा : महिलांनी स्वतंत्र न राहण्याचा मनस्मृतीचा डाव - राहुल गांधी

अडीच महिन्यांची गरोदर

शनिवारी (22 ऑगस्ट) अल्पवयीन मुलीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्यामुळे कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलगी अडीच महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले, ज्यामुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीला जिल्हा रुग्णालयात पाठवले, जिथे वैद्यकीय तपासणीत तिच्या गर्भधारणेला अधिकृत दुजोरा मिळाला.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात मुलासह वडिलांची 300 फूट खोल दरीत उडी, आईनं पाहिलं अन्..

70 वर्षीय आजोबांविरुद्ध गुन्हा

या घटनेनंतर पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेत आरोपी 70 वर्षीय आजोबांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडितेचा जबाब, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.