उसाच्या शेतात मुलगी आक्षेपार्ह अवस्थेत, वडिलांनी बघताच घडलं भयंकर

मुंबई तक

• 03:10 PM • 23 Aug 2026

एका मुलीने तिच्या प्रियकरासोबत मिळून वडिलांची हत्या केली आहे. मुलगी आणि तिचा प्रियकर दोघंही उसाच्या शेतात आक्षेपार्ह अवस्थेत वडिलांना दिसले. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

उसाच्या शेतात मुलगी आक्षेपार्ह अवस्थेत

point

वडिलांनी बघताच घडलं भयंकर

Crime News : एका 52 वर्षीय व्यक्तीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. कृष्णा असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कृष्णा यांची 17 वर्षांची मुलगी दुर्गा आणि शेजारच्या गावातील लक्ष्मण नावाच्या युवकाचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कृष्णा यांचा या नात्याला  विरोध होता आणि ते मुलीचे लग्न दुसरीकडे करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तिचे वय कमी असल्याने लग्न जुळू शकत नव्हते. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

उसाच्या शेतात आक्षेपार्ह अवस्थेत

शुक्रवारी (21 ऑगस्ट) संध्याकाळच्या सुमारास कृष्णा नेहमीप्रमाणे आपल्या बकऱ्या चरण्यासाठी घराबाहेर पडले होते. गावाजवळील स्मशानभूमीजवळ असलेल्या उसाच्या शेतात त्यांची मुलगी दुर्गा आणि तिचा प्रेमी लक्ष्मण हे दोघे एकत्र होते. बकऱ्या चारत असताना कृष्णा अचानक त्याच उसाच्या शेताजवळ पोहोचले. तेथे आपली मुलगी आणि तिचा प्रेमी आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे पाहून कृष्णा यांचा पारा चढला. त्यांनी या प्रसंगाला जोरदार विरोध केला आणि दोघांशीही त्यांचा भीषण वाद सुरू झाला.

हे ही वाचा : कावड यात्रेत DJ वाहनांची धडक; एकाचा मृत्यू; Video व्हायरल

मुलगी अन् प्रियकराने मिळून केली हत्या

वाद विकोपाला गेल्यानंतर कृष्णा यांनी आपल्या हातातील काठीने लक्ष्मणवर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र लक्ष्मणने तो वार चुकवला. यानंतर संतापलेल्या प्रेमी युगुलाने मिळून कृष्णा यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. त्यांनी कृष्णा यांचा गळा आवळून त्यांची जागेवरच हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह गमछ्याने बांधला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तो जवळच असलेल्या एका कालव्यात फेकला.

हे ही वाचा : बारामती : रोहित पवारांच्या पीएच्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?

आरोपींनी काय कबुली दिली?

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कृष्णा घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधमोहीम सुरू केली. त्यांचे पुतणे अजय यांनी परिसरात शोध घेतला, परंतु काहीच माहिती मिळाली नाही. अखेर संशय आल्याने अजय यांनी दुर्गाकडे कसून चौकशी केली असता, तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, घटनास्थळाची पाहणी करून आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.