देश विकणाऱ्या सोबत राहायचे की, देश वाचवणाऱ्या सोबत.. विचार करण्याची वेळ: नाना पटोले

मुंबई तक

• 09:49 AM • 04 Dec 2021

योगेश पांडे, नागपूर ‘सध्या देशाची जी परिस्थिती आहे ती पाहता सर्वच राजकीय पक्षांनी विचार करण्याची वेळ आली आहे की, त्यांनी देश विकणाऱ्यांसोबत राहायचे की देश वाचवणाऱ्यांसोबत.’ असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते. ‘केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर देशात त्यांनी जी तबाही सुरू केली आहे, चीन अरुणाचल प्रदेशमध्ये […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, नागपूर

हे वाचलं का?

‘सध्या देशाची जी परिस्थिती आहे ती पाहता सर्वच राजकीय पक्षांनी विचार करण्याची वेळ आली आहे की, त्यांनी देश विकणाऱ्यांसोबत राहायचे की देश वाचवणाऱ्यांसोबत.’ असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

‘केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर देशात त्यांनी जी तबाही सुरू केली आहे, चीन अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून बसला आहे. दररोज देशातील एक-एक प्रॉपर्टी केंद्र सरकार विकत आहे. देशातील संविधानिक व्यवस्था कमकुवत करण्याचं काम भाजपकडून होत आहे. ममता बॅनर्जी यांनी केलेले वक्तव्य हे त्या देश विकणाऱ्या सोबत असल्याचं स्पष्ट होतं. म्हणूनच आजच्या ‘सामना’मधून ममता बॅनर्जी यांच्यावर करण्यात आलेली टीका ही देश हिताचं आहे.’ असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

दरम्यान, याचवेळी बोलाताना नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाबाबत देखील महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होणार असून वेळेवर त्यांचे नाव जाहीर केले जाईल.’ अशी माहिती देखील नाना पटोले यांनी यावेळी दिली आहे.

पाहा ‘सामना’तून ममता बॅनर्जींवर काय करण्यात आलीए टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी नुकत्याच महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेल्या. या दौऱ्यात त्यांनी अप्रत्यक्षरित्या राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका केली होती. तर तृणमूलचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यामुळे भाजपविरोधात तिसऱ्या आघाडीचीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, तृणमूलकडून काँग्रेसवर झालेल्या टीकेनंतर शिवसेनेनं ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

Sharad Pawar हे विरोधकांचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय आकर्षण-संजय राऊत

“ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढ्या सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न.” अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

    follow whatsapp