ओटीपी शेअर करण्याच्या बहाण्याने एका बँक कर्मचाऱ्याचीच फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांकडून 3 लाख 80 हजार रुपये लाटल्याचं समोर आलं आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये असलेल्या बँकेच्या शाखेत शुक्रवारी ही घटना घडली.
ADVERTISEMENT
शुक्रवारी बीकेसीमधील बँक कार्यालयात असलेल्या एका कर्मचाऱ्याला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ज्यानं स्वत:ची ओळख "मुकेश कुमार" अशी सांगत आपण बँकेतून बोलत असल्याचं सांगितलं. नुकत्याच घेतलेल्या एका क्रेडिट कार्डशी संबंधीत माहितीची पडताळणी करत असल्याचं या सायबर गुन्हेगारानं सांगितलं. कॉल करणाऱ्याने आधी बँक कर्मचाऱ्याला विश्वासात घेण्यासाठी त्याचा क्रेडिट कार्ड नंबर आणि फोन नंबर सांगितला. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो आम्हाला शेअर करा असं सायबर गुन्हेगारानं सांगितलं.
हे ही वाचा >> Central Railway : मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर लोखंडाचा भला मोठा तुकडा, इंजिन धडकलं, घातपाताचा प्रयत्न?
बँक कर्मचाऱ्यानं या प्रक्रियेवर विश्वास ठेवून ओटीपी शेअर केला. पण ओटीपी शेअर करताच त्याच्या खात्यातून 3.80 लाख रुपये काढण्यात आले. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या बँक कर्मचाऱ्यानं बीकेसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, आरोपीनं बँक कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती आधीच मिळवली होती. याच माहितीचा वापर करुन विश्वासात घेतलं.
हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यापूर्वी देशमुख कुटुंबाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
एकूणच, या घटनेनंतर पोलिसांनी सर्वसामान्यांना सावध राहा, कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत OTP किंवा बँकेशी संबंधित माहिती शेअर करू नये असं आवाहन केलं आहे. तसंच ओटीपी किंवा पासवर्डसारखी गोपनीय माहिती विचारण्यासाठी बँका कधीही कॉल करत नाहीत असंही पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
