Shirdi Sai Baba: शिर्डी: महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी शिर्डीच्या साई संस्थानाचं नाव येतं. शिर्डीच्या साईबाबांचे केवळ देशातच नाहीतर जगभर भक्त आहेत. मात्र, आता साईंच्या संस्थानला पाईप बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. यामुळे आता शिर्डीत भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
साई संस्थानाला धमकीचा मेल
2 मे 2025 रोजी अजित जक्कुमोला यांच्या नावाने धमकीचा मेल हा पाठवण्यात आला होता. तसेच त्याचा आयपी पत्ता हा कर्नाटकचा असल्याचे सांगितले जात आहे. धमकीचा मेल हा साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना आला होता. यामुळे शिर्डी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
हे ही वाचा>> 'हा बघा कोयता गँगचा कालचा थरार..' रोहित पवारांनी थेट दाखवला Video, काका अजित पवारांना घेरलं
साई संस्थानला कडक सुरक्षा तैनात
अशातच आता साई संस्थानला कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत. साई संस्थान पाईप बॉम्बने उडवण्याची मेलद्वारे धमकी दिल्यानंतर साई संस्थानचे अधिकारी रोहिदास माळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 351(4) अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा>> रात्रपाळीला गेलेला पती घरी परतला अन् हादरलाच, भिवंडीत तीन मुलांसह पत्नीने संपवलं आयुष्य...
दरम्यान, याआधीही अनेकदा असे धमकीचे मेल आले होते. त्यावर नेमकं सायबर क्राईमनं काय पाऊल उचललं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशी कुणीतरी मस्करी तर केली नाही ना? कोणीतरी खट्याळपणा तर केला नाही ना? याबाबतचा तपास आता शिर्डी पोलीस करत आहेत. या धमकीच्या मेलमुळे आता भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साई संस्थांकडे मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात आहेत. त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणांचाही कडक बंदोबस्त आहे. त्यामुळे भाविकांनी कसलाही संकोच न बाळगता दर्शनाला यावे, असे आवाहन त्यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
