रात्रपाळीला गेलेला पती घरी परतला अन् हादरलाच, भिवंडीत तीन मुलांसह पत्नीने संपवलं आयुष्य...
Bhiwandi Crime News : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील फेणे गावात महिलेने तिच्या तीन मुलांसह आत्महत्या केली. महिलेचा पती ड्युटीवरून घरी परतल्यानंतर संबंधित घटना उघडकीस आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भिवंडीत आईसह तीन मुलांनी गळफास लावून केली आत्महत्या

पोलीस तपासादरम्यान सुसाईड नोट आली समोर

या घटनेमुळे भिवंडी हादरून गेलं आहे
Bhiwandi Crime News: भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील फेणे गावात महिलेने तिच्या तीन मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा पती ड्युटीवरून घरी परतल्यानंतर संबंधित घटना उघडकीस आली. या आत्महत्येमागील ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. अशातच आता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा दाखल झाला आहे. या घटनेनं भिवंडी हादरून गेलं आहे. पोलिसांनी संबंधित मृतदेह ताब्यात घेतले असून या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. गळफास घेतलेल्या महिलेचे नाव हे पुनिता (वय 32 वर्ष) आहे. तर मुलगी नंदिनी (वय 12 वर्ष), नेहा (वय 7 वर्ष) आणि अनु (वय 4 वर्ष) अशी आहेत.
हेही वाचा : 'हा बघा कोयता गँगचा कालचा थरार..' रोहित पवारांनी थेट दाखवला Video, काका अजित पवारांना घेरलं
काय होतं नेमकं प्रकरण?
पती लालजी भरती हा यंत्रमाग कामगार आहे. तो आज सकाळी त्याची नाईट शिफ्ट संपवून घरी गेला. त्यानंतर तो बराच वेळ दरवाजा ठोठावत होता. मात्र, कोणीही दार उघडलं नाही? त्यामुळे त्याला काहीशी शंका आली. म्हणून त्याने घराच्या एका छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
आतील दृश्य पाहून लालजीने अक्षरश: हंबरडा फोडला. कारण त्यावेळी घराच्या छताच्या लोखंडी हँगरला पत्नी आणि मुलांसह चारही जणांचे मृतदेह लटकलेले होते. यानंतर बीट मार्शल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. ज्यानंतर लोखंडी हँगरला लटकवण्यात आलेले सर्व मृतदेह खाली उतरविण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी त्यांना इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलं.
हेही वाचा : लग्नाच्या वरातीत बंदूक घेऊन जल्लोष, गोळी सुटली अन् थेट नवरदेवाला लागली, प्रकरण काय?
सुसाईड नोटमध्ये काय?
दरम्यान, आत्महत्येपूर्वी पुनिता हिने सुसाईड नोट देखील लिहिली होती. जी पोलिसांच्या हाती लागली आहे. याच सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असं लिहिल आहे.
मात्र, असं असलं तरीही एकाच वेळी चार जणांनी आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे. पण, अद्यापही त्यामागील ठोस कारण समोर आलेलं नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व दिशेने तपास करत आहेत.