लग्नाच्या वरातीत बंदूक घेऊन जल्लोष, गोळी सुटली अन् थेट नवरदेवाला लागली, प्रकरण काय?

मुंबई तक

गोळीबाराच्या घटनेनंतर लग्नसोहळ्यातील समारंभात एकच गोंधळ उडाला. जल्लोष करताना गोळीबार झाल्याचे रिसॉर्ट संचालकाने मान्य केले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाच्या वरातीत जोशात नाचताना नवऱ्या मुलावर गोळीबार

point

विवाह सोहळ्याला गालबोट

point

बिहारमधील सहरसा येथील धक्कादायक घटना समोर

Crime News : लग्न कार्य हे  दोन जीवांच्या संसाराची नवीन सुरूवात करण्यासाठी केलेला समाजमान्य सोहळा असतो. यासाठी वर-वधुंचे वडील हे लग्नाच्या वरातीसाठी बँड बाजा आणि गाण्याच्या ठेक्यावर जल्लोष करत आनंद लुटतात. मात्र, याच सोहळ्यामध्ये जे व्हायला नको होतं तेचं झालं आहे. बिहारमधील सहरसामध्ये एका लग्नाच्या वरातीत जोशात नाचत असताना एकाने गोळीबार केला आणि ती गोळी घोड्यावर स्वार झालेल्या नवरदेवाला लागल्याने विवाह सोहळ्याला गालबोट लागलं आहे.

नेमकं काय झालं? 

हे ही वाचा >> पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज; बीडच्या पोराला पुण्यात पकडलं, प्रकरण नेमकं काय?


बिहारमधील सहरसा येथे मुलाच्या लग्नसोहळ्यानिमित्त गोळीबार करण्यात  आल्याची घटना घडली आहे. लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान, एका डॉक्टरांनी या आनंदोत्सवात गोळीबार केला. मात्र, डॉक्टरांनी झाडण्यात आलेली गोळी ही नवरदेवाला लागली. या आनंदाच्या  वातावरणात विवाह सोहळ्याला गालबोट लागले. ही घटना बुधवार ३० एप्रिल २०२५ रोजी गंगजळा चौकात एका रेसॉर्टमध्ये घडली आहे. यावेळी गोळीबारात जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी तातडीने उपचारासाठी रुग्णालयत नेले, मात्र, त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधित व्यक्तीला ते पुन्हा घेऊन परतले.

पोलिसांना माहिती दिली नाही

लग्न सोहळ्यातील मिरवणुकीत आलेल्या एका डॉक्टरने नाचताना जोशात गोळीबार केला. याबाबत माहिती घटनास्थळी उपस्थितांनी दिली आहे. मात्र, चुकून एक गोळी डॉक्टरच्या मुलाला लागली. लग्नासाठी नवरा आणि नवरी मुलीच्या दोन्ही बाजूने मोठ्या संख्येने डॉक्टर उपस्थित होते. गोळीबाराच्या घटनेनंतर लग्नसोहळ्यातील समारंभात एकच गोंधळ उडाला. जल्लोष करताना गोळीबार झाल्याचे रिसॉर्ट संचालकाने मान्य केले. एवढा सर्व प्रकार घडल्यानंतरही पोलिसांना याबद्दलची माहिती दिली नाही. 

हे ही वाचा >> आईच्या डोळ्यादेखत 11 महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून नेलं; 36 तासांच्या शोधमोहिमेनंतर थेट...

अशातच संबंधित प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.  ठाण्याचे प्रभारी सुबोध कुमार म्हणाले की, रिसॉर्ट मालकाने किंवा जखमी झालेल्या तरुणाने विवाह सोहळ्यादरम्यान झालेल्या गोळीबारावर भाष्य केले नाही. याचपार्श्वभूमीवर बिहार पोलिसांनी कडक पाऊल उचलत आरोपींकडून शस्त्र घेतले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp