पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज; बीडच्या पोराला पुण्यात पकडलं, प्रकरण नेमकं काय?
पंकजा मुंडेंना बीड जिल्हयातील युवकाने केले अश्लील मेसेज, युवकाचे नाव हे अमोल काळे असून त्याचे वय वर्षे २५ असल्याचे सांगण्यात येत आहे, अमोल काळे हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पंकजा मुंडेंना बीड जिल्हयातील युवकाने केले अश्लील मेसेज
अश्लिल मेसेज करणाऱ्या युवकाचे नाव हे अमोल काळे
अमोल काळे हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी
Pankaja Munde: योगेश काशिद, बीड: भाजपच्या मंत्री आणि नेत्या पंकजा मुंडे यांना एका युवकाने सतत फोन आणि अश्लील मेसेज करून त्रास दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी संबंधित युवकाच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतलं आहे. अश्लील मेसेज करणाऱ्या युवकाचे नाव हे अमोल काळे असून तो 25 वर्षांचा असल्याचे समजते आहे. मुळच्या बीडमधील परळीचा असलेल्या आरोपी अमोल काळेला पुण्यात अटक करण्यात आली आहे.
पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
या प्रकरणात आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस नोडल सायबर पोलिसांनी अमोलच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून फोनवरून पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज आणि फोनद्वारे सतावत होता. यामुळे पंकजा मुंडेंच्या कार्यालयातून सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर सायबर गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.
हे ही वाचा >> बीडमध्ये दारूसाठी मुलानं 72 वर्षांच्या आईच्या डोक्यात दगड घातला, गाव हादरलं... तपासात काय आढळलं?
पोलिसांनी या प्रकरणात कलम 78 व कलम 79 आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच पोलिसांनी या प्रकरणाचा आता सखोल तपास देखील सुरू केला असल्याचे सांगण्यात येत आहे. सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने अमोल काळेच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आरोपी अमोल काळे याला अटक केली. चौकशीत काळेने पंकजा मुंडे यांना फोन केल्याची कबुली दिली. अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. एका सायबर अधिकार्याने सांगितले की, आरोपी हा विद्यार्थी आहे आणि त्याने अपशब्द वापरण्यामागील आणि त्रासदायक वर्तनामागील हेतू सध्या तपासला जात आहे.










