बीडमध्ये दारूसाठी मुलानं 72 वर्षांच्या आईच्या डोक्यात दगड घातला, गाव हादरलं... तपासात काय आढळलं?

मुंबई तक

मृतदेह अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी छोत्राबाईंचा मुलगा अमृत भानुदास सोनार याला ताब्यात घेतलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दारूचा नाद, बायको मुलांशी रोज करायचा वाद

point

दारूसाठी पैसे न दिल्यानं डोक्यात दगड घातला

point

आईला दगडाने ठेचून संपवलं, बीड हादरलं

Beed Crime News : बीडमध्ये गेल्या वर्षभरात समोर आलेल्या घटनांमुळे राज्यभर चर्चा सुरूय. बीड पोलिसांसमोर गुन्हेगारी संपवण्याचं मोठं आवाहन निर्माण झालंय. त्यातच आता बीडमध्ये पुन्हा एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.  दारूसाठी पैसे न दिल्यानं एका नशेखोर तरूणानं थेट आपल्या आईचीच हत्या केली आहे. आज शुक्रवारी सकाळी अंबाजोगाई तालुक्यात ही घटना घडली. मृत महिलेचं नाव छोत्राबाई भानुदास सोनार (वय 72) असं आहे. घटनेची माहिती मिळताच, अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपी मुलांना ताब्यात घेतले आहे.

दारूसाठी रोज आईला त्रास द्यायचा

हे ही वाचा >> "काश्मिरी लोकांविरोधात द्वेष...", ज्यांच्या फोटोनं देश हळहळला, 'त्या' हिमांशी नरवाल काय म्हणाल्या?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छोत्राबाईचा मुलगा मद्यपी आहे. मुलगा अमृत हा दारू पिण्यासाठी दररोज आईला त्रास देत होता. रोज त्याच्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. आईने पैसे देण्यास नकार दिल्यानं संतापलेल्या मुलानं थेट आईला दगडानं ठेचून मारलं. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस सध्या घटनास्थळाची पाहणी करत आहेतय 

मृतदेह अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी छोत्राबाईंचा मुलगा अमृत भानुदास सोनार याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे येलदा गावात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा >> बाहेरच्या मुस्लिमांना मशिदीत नो एन्ट्री... पुण्यातील ग्रामपंचतींचा ठराव काय? 'पहलगाम'नंतर तणाव

दरम्यान, 71 वर्षीय छोत्राबाई सोनार यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यापैकी मुलीचं लग्न झालेलं आहे. तर दुसरीकडे छोत्राबाईंना एकुलता एक मुलगा आहे. आईने अमृतचं लग्नही लावून दिलं. अमृत काही दिवसांपासून त्याच्या पत्नीसोबत आनंदाने राहत होता, त्याला एक मुलगाही झाला. मात्र, नंतर दारूच्या व्यसनामुळे अमृत पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करायला लागला. अमृत वाद घालून पत्नीला, मुलांना माहेरी पाठवून द्यायचा.  आई छोत्राबाई स्वत: काम करुन दोघांचंही पोट भरायची. मुलगा अमृत दारू प्यायचा तेव्हा आई दररोज मुलाला दारू पिण्यापासून रोखायची. अशाच वादातून एक नराधमाने थेट आपल्या आईची हत्या केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp