"काश्मिरी लोकांविरोधात द्वेष...", ज्यांच्या फोटोनं देश हळहळला, 'त्या' हिमांशी नरवाल काय म्हणाल्या?
विनय नरवालच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरादरम्यान पत्नी हिमांशीने या भावना मांडल्या. हिमांशीने तिच्या कुटुंबासह शिबिरात रक्तदान केले. हिमांशी म्हणाल्या, ही आमच्यासाठी विनयला खरी श्रद्धांजली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पहलगाम हल्ल्यानं देश हादरला
मृत विनय नरवाल आणि हिमांशी यांच्या फोटोने देश हळहळला
हा फोटो देशभर व्हायरल झाला
हिमांशी नरवाल यांनी देशाला काय संदेश दिला
Himanshi Narwal on Kashmiri Muslims : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले करनालचे रहिवासी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीचा फोटो पाहून देश हळहळला होता. त्यांचा तो फोटो घेऊन अनेकांनी स्टोरी आणि पोस्ट शेअर केल्या होत्या. त्याच हिमांशी यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा होतेय. पहलगाममधील घटनेनंतर लोक मुस्लिम आणि काश्मिरींविरुद्ध ज्या पद्धतीने बोललं जातंय, ते घडू नये अशी भूमिका हिमांशी यांनी मांडली आहे.
हे ही वाचा >> बाहेरच्या मुस्लिमांना मशिदीत नो एन्ट्री... पुण्यातील ग्रामपंचतींचा ठराव काय? 'पहलगाम'नंतर तणाव
हिमांशी म्हणाल्या, "आम्हाला फक्त शांती आणि शांती हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे. ज्यांनी चूक केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मी संपूर्ण देशाला आवाहन करू इच्छिते की विनय नरवाल कुठेही असो, तो निरोगी राहावा यासाठी प्रार्थना करा." त्या पुढे बोलताना असंही म्हणाल्या की, मी कुणाचाही द्वेष करत नाही.
विनय नरवालच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरादरम्यान पत्नी हिमांशीने या भावना मांडल्या. हिमांशीने तिच्या कुटुंबासह शिबिरात रक्तदान केले. हिमांशी म्हणाल्या, ही आमच्यासाठी विनयला खरी श्रद्धांजली आहे. यावेळी बोलत असताना कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
"काश्मिरींविरोधात चुकीची वक्तव्य करू नका"
हिमांशी नरवाल म्हणाल्या की, आमच्यासोबत घडलेल्या घटनेप्रमाणे हे इतर कोणासोबतही घडू नये. आम्हाला फक्त शांती हवी आहे. ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे. विशेष म्हणजे, हिमांशीने मुस्लिम आणि काश्मिरींविरुद्ध द्वेषपूर्ण वक्तव्यांवर आक्षेप घेतला आहे. हे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.










