आईच्या डोळ्यादेखत 11 महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून नेलं; 36 तासांच्या शोधमोहिमेनंतर थेट...
बुधवारी सकाळी भिसे कुटुंब त्यांच्या शेळ्या चारत असताना ही घटना घडली. एक बिबट्या आला आणि त्यानं अन्वितला काही कळण्याच्या आत उचलून नेलं. बिबट्या मुलाला ओढत असल्याचं दिसताच आईनं आरडाओरडा केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यातील दौंड परिसरातील धक्कादायक घटना

लहान बाळाला बिबट्याने उचलून नेलं

तब्बल 36 तास पोलीस आणि वन विभागाची शोधमोहीम
Pune Daund Leopard News : जंगलात राहणाऱ्या हिंस्त्र श्वापदांचा माणसांशी होणारा संघर्ष दिवसेंदिवस वाढत जातोय. अशातच पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बिबट्यानं थेट एका 11 महिन्यांच्या बाळाला पळवून नेल्याचं समोर आलंय.
हे ही वाचा >> बीडमध्ये दारूसाठी मुलानं 72 वर्षांच्या आईच्या डोक्यात दगड घातला, गाव हादरलं... तपासात काय आढळलं?
दौंड तालुक्यातील दहितणेमधील बापुजीबुवा वस्तीमध्ये बुधवारी 30 एप्रिल रोजी सकाळी घडली. या घटनेनंतर वन विभाग, स्थानिक नागरिक आणि पोलीस विभाग मुलाचा शोध घेत होते. अखेर आज या बाळाचा मृतदेह सापडला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या बाळाचा मृतदेह सापडला आहे. या अकरा महिन्यांच्या बाळाचं नाव अन्वित धुला भिसे असं आहे.
हे ही वाचा >> डोक्यात दगड घालून रितेशला संपवलं, स्वत: पोलिसांना शरण... नाशिक हादरलं, प्रकरण काय?
बुधवारी सकाळी भिसे कुटुंब त्यांच्या शेळ्या चारत असताना ही घटना घडली. एक बिबट्या आला आणि त्यानं अन्वितला काही कळण्याच्या आत उचलून नेलं. बिबट्या मुलाला ओढत असल्याचं दिसताच आईनं आरडाओरडा केला. पण तोपर्यंत बिबट्या मुलाला घेऊन पळून गेला होता.
दरम्यान, ही घटना घडल्यापासून स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या पथकाने शोध मोहीम सुरू केली होती. अखेर छत्तीस तासांनंतर बाळाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.