लोखंडी सळ्या चोरल्याच्या संशयावरून पाच किशोरवयीन मुलांना डांबलं, गुप्तांगात पेट्रोल ओतून आईला...

मुंबई तक

crime news : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीतून लोखंडी रॉड चोरल्याच्या संशयावरून पाच अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवण्यात आले. आरोपी हे घटनास्थळापासून काही अंतरावरील पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. याच अल्पवयीन मुलांना क्रूरपणे मारहाण केली नंतर त्यांच्या गुप्तांगावर पेट्रोल ओतले होते. या घटनेनं परिसर हादरून गेला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलांना गरम चमच्यांने चटके​​​​​​​ दिले

point

आरोपींनी दारूच्या नशेत पीडित मुलांच्या गुप्तांगात पेट्रोल ओतले

Crime News : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीतून लोखंडी रॉड चोरल्याच्या संशयावरून पाच अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवण्यात आले. आरोपी हे घटनास्थळापासून काही अंतरावरील पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. याच अल्पवयीन मुलांना क्रूरपणे मारहाण केली नंतर त्यांच्या गुप्तांगावर पेट्रोल ओतले होते. या घटनेनं परिसर हादरून गेला. ही घटना गुरुग्रामच्या नथुपूरमच्या यू-ब्लॉकमध्ये डीएलएफ फेज 3 पोलीस ठाणे हद्दीत घटना घडली. 

हे ही वाचा : पुणे : कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोची केली निर्घृण हत्या, नातेवाईकांकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

मुलांना गरम चमच्यांने चटके दिले

एवढंच नाहीतर गरम चमच्यांने त्यांना चटके देखील देण्यात आले होते. आपल्या मुलाला शोधत असलेली एक महिला आरोपींकडे आली. नंतर त्या महिलेला देखील शिवीगाळ करण्यात आली आणि नंतर जीवे मारहाण् करण्याची धमकी देखील दिली. बराच वेळ विनंती केल्यानंतर अखेर अल्पवयीन मुलांना सोडले. महिलेनं केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

महिलेनं बिहारच्या डीएलएफ फेज 3 पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी म्हटलं की, ती नाथुपूर येथील भाडेतत्त्वाच्या घरात राहते आणि एका शाळेत काम करते. सोमवारी ती कामावर गेली असता, ती दुपारी पुन्हा घरी परतली होती, तेव्हा तिचा 12 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. बेपत्ता मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, महिलेनं सांगितलं की, तिचे दोन्ही मुलं बेपत्ता आहेत. 

आईच्या विनंतीनंतर मुलाला सोडलं

अल्पवयीन मुलांचा शोध घेताना, तिला कळले की, मुलांना यू ब्लॉकमधील दीपकच्या पीजीमध्ये ठेवण्यात आले होते. ती तिच्या मुलाला शोधत दीपकच्या पेइंग गेस्ट असलेल्या घरी गेली. तिथे तिचा मुलगा आणि इतर चार अल्पवयीन मुले एका खोलीत आढळून आले. तिच्या लक्षात आले की, खोलीत पाच ते सहा लोक उपस्थित होते आणि त्यांनी सर्व अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवले होते. आरोपीने महिलेवर अत्याचार केला आणि तिलाही तिथेच बसवले. महिलेनं हात जोडून पदर पसरल्यानंतर तिला आणि अल्पवयीन मुलांना सोडवण्यात आले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp