दिवस बदलत असतात. तेही त्यात आहेत. याचा अर्थ त्यांनी लक्षात ठेवला पाहिजे असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता दिला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री या ठिकाणी भेट घेतली. त्यानंतर हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?
संजय राऊत म्हणजे शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ आहे. ती पुन्हा धडाडणार का? असा प्रश्न केला गेला. त्यावर मी इतकंच सांगेन की तोफ ही तोफच असते. तोफ मैदानात आणावीच लागत नाही. या तोफेचा पल्ला सगळ्यांनाच माहित आहे. काही लोक तोफ म्हणून आणतात पण त्या तोफेचा गोळा त्यांच्याच पायाशी पडतो. मात्र आमची तोफ लांब पल्ल्याची आहे असं संजय राऊत यांच्याबाबत उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
संजय माझा जिवलग मित्र
संजय राऊत माझा जिवलग मित्र आहे. संजय राऊत आमच्या कुटुंबापैकीच आहे. सुनीलचंही कौतुक आहे. संजयची आई, वहिनी आणि मुलींचंही मला कौतुक वाटतं. हे संकट आल्यानंतर धीर कुणी कुणाला द्यायचा हा प्रश्न होताच कारण आमचं कुटुंब काही वेगळं नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मी संजयला तुरुंगात भेटायला जाणार होतो
मी मध्यंतरी खूप भावूक झालो होतो. संजयला भेटालया तुरुंगातही जाणार होतो. तो काळ आमच्यासाठी खडतर होता. रोजच काही काम असो वा नसो आमचं बोलणं व्हायचं. पण ते बोलणं बंद झालं होतं असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच संजयने लढाई जिंकून दाखवली आहे तो डगमगला नाही. तपास यंत्रणांच्या विरोधात आपचेही काही लोक लढत आहेत. तेलंगणच्या लोकांनी व्हीडिओच्या माध्यमातून प्रकरणच बाहेर आणलं आहे. सोरेन आणि ममतादीदींना छळलं जातं आहे हे सगळे एकत्र आले तर किती मोठी ताकद उभी राहिल याचा अंदाज केंद्राला नाही असंही मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.
संजय राऊत यांच्या जामिनानंतर आनंद याशिवाय दुसरी प्रतिक्रिया नाही
संजय राऊत यांच्या जामिनानंतर आनंदानंतर दुसरी प्रतिक्रिया असू शकत नाही. या आनंदाबरोबरच संजय राऊत यांच्या धाडसाचं कौतुक आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, सामनाचे कार्यकारी संपादक आहेत आणि त्याचबरोबर माझे जीवलग मित्रही आहेत. मित्र तोच असतो जो संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. तसा हा लढणारा मित्र आहे
ADVERTISEMENT
