भर चौकात गोळीबार! काही सेकंदातच वाळू माफीयाचा खेळ खल्लास, पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्..

Jalgaon Murder Case : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे वाळू माफियाच्या हत्येच्या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. भर चौकात गोळीबार करून वाळू व्यावसायिकाची हत्या करण्यात आली.

प्रतीकात्मक छायाचित्र.

प्रतीकात्मक छायाचित्र.

मुंबई तक

• 10:29 PM • 05 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पाचोरा बस स्थानकात केला मोठा गोळीबार

point

वाळू माफीयाची भर चौकात केली हत्या

point

खुनाच्या घटनेमुळं जळगाव हादरलं

Jalgaon Murder Case : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे वाळू माफियाच्या हत्येच्या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. भर चौकात गोळीबार करून वाळू व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. आकाश मोरे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गोळीबारीच्या या घटनेमुळं संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला असून पुढील तपास सुरु आहे. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार झाला. या गोळीबारात आकाश मोरे (25) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आकाश मोरेवर अज्ञात इसमाने गोळ्या झाडल्या. त्यामुळे तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. 

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसर सील केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपास सुरू असून, आकाश मोरे याचा पूर्वीचा कुठला वाद होता का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हे ही वाचा >> 'आमच्या दोघांमध्ये अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी केला दूर', उद्धव ठाकरेंनी का केली अशी टीका?

त्या पोलीस अधिकाऱ्याचीही केली निर्घृण हत्या

वलगांव पोलीस ठाण्यातील असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) अब्दुल कलाम यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मागील आठवड्यात शनिवारी घटना घडली होती. ड्युटी संपल्यावर बाईकवरून घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्यांची निर्घृण हत्या केली होती. अब्दुल कलाम यांच्या पोटात आणि छातीत धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला करणारे सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

हे ही वाचा >> Raj-Uddhav Thackeray: 'जे बाळासाहेबांना, जमलं नाही.. ते फडणवीसना जमलं', राज ठाकरे असं का म्हणाले?

मात्र, पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दोन विशेष तपास पथके स्थापन केली.अवघ्या 12 तासांत हत्येत सहभागी असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात यश आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख जियाउद्दीन अहसानुद्दीन (22) आणि आवेज अयूब खान (22) अशी आहे. तिसरा आरोपी फाजिल साबिर खान (23) याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

    follow whatsapp