Married Woman Love Affair Shocking News : अनैतिक संबंधाचे परिणाम कधी कधी अत्यंत वाईट होतात. प्रेमात आंधळे झालेल्या लोकांना एक ना एक दिवस किंमत मोजावीच लागते, असं म्हणतात. तेच घडलं आहे उत्तरप्रदेशच्या मथुरात. येथील एका पतीला त्याच्या पत्नीच्या अफेअरबाबत समजलं. पण तरीही त्याने मोठ्या मनाने पत्नीला माफ केलं. पण पत्नीने पुन्हा धोका देऊ नये, म्हणून तिच्यावर थोडेफार निर्बंध लादले. म्हणजेच पती पत्नीवर नजर ठेऊ लागला. पतीला कदाचित माहित नव्हतं की, असं करणं त्याला महागात पडू शकतं.
ADVERTISEMENT
पोलीस तपासात महिलेचे धक्कादायक कारनामे उघड झाले अन्...
पत्नीला पतीचे हे कारनामे अजिबात आवडत नव्हते. पतीच्या दबावामुळे पत्नीला प्रियकराला भेटता येत नव्हतं. त्यामुळे पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं. शुक्रवारी पोलिसांनी मृताची पत्नी आणि प्रियकराला अटक केली. हत्येत वापरण्यात आलेलं सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केलं. मोबाईलसह अनेक पुरावे जमा केले. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेची अनेक धक्कादायक प्रकरणे समोर आणली.
हे ही वाचा >> Raj-Uddhav Thackeray: 'जे बाळासाहेबांना, जमलं नाही.. ते फडणवीसना जमलं', राज ठाकरे असं का म्हणाले?
ही संपाजनक घटना कोसीकला गावात घडली. पोलिसांनी म्हटलंय की, ऐंच गावातील रहिवासी 27 वर्षीय गोविंद घरातून दारूच्या नशेत बाहेर पडला होता. याची माहिती गोविंदची पत्नी कविताने तिचा प्रियकर गुंजार उर्फ गुलजार भोलेला दिली. पुढे भेटायचं असेल तर गोविंदची हत्या कर, असं कविताने गुंजारला सांगितलं. त्यानंतर गुंजारने गोविंदच्या मानेवर वार केले आणि त्याचा मृतदेह सुनसान जागेवर फेकला.
पोलिसांच्या तपासात या गोष्टीचाही खुलासा झाला आहे की, मृत गोविंदची पत्नी कविताचे गुंजारशी अनैतिक संबंध होते. कविताचे तिच्या दीरासोबतही प्रेमसंबंध होते. तिच्या दीरानेच तिला मोबाईल फोन दिला होता. या फोनचा वापर करून ती गुंजारसोबत बोलायची. याआधी 2020 मध्ये अन्य एका तरुणासोबतही कविताचं अफेअर होतं. याबाबत गोविंदला कळलं, तेव्हा दोघांमध्ये वादविवाद झालं होतं. हे प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं. दरम्यान, गोविंदच्या हत्याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
हे ही वाचा >> Raj-Uddhav: बाळासाहेबांच्या मनातलं चित्र कॅमेऱ्यात झालं कैद, ठाकरेंच्या शिवसेनेने शेअर केलेला 'हा' फोटो पाहिलात का?
ADVERTISEMENT
