Raj-Uddhav: बाळासाहेबांच्या मनातलं चित्र कॅमेऱ्यात झालं कैद, ठाकरेंच्या शिवसेनेने शेअर केलेला 'हा' फोटो पाहिलात का?

मुंबई तक

Raj-Uddhav Photo: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो शिवसेना UBT ने पोस्ट केला आहे. या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी बाळासाहेबांची इच्छा होती. जी अखेर आज पूर्ण झाली आहे.

ADVERTISEMENT

बाळासाहेबांच्या मनातलं चित्र कॅमेऱ्यात झालं कैद (फोटो सौजन्य: Shiv Sena UBT)
बाळासाहेबांच्या मनातलं चित्र कॅमेऱ्यात झालं कैद (फोटो सौजन्य: Shiv Sena UBT)
social share
google news

मुंबई: हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना UBT यांनी जो एल्गाल पुकारला होता. त्यासाठी मनसेने 5 जुलैला मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, या मोर्चा आधीच फडणवीस सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर मागे घेतला. त्यामुळे मोर्चाऐवजी ठाकरे बंधूंनी मुंबईत विजयी मेळावा घेण्याचं ठरवलं. ज्यानुसार आज वरळी डोम येथे विजयी मेळावा घेण्यात आला. 

तब्बल 18 वर्षानंतर मराठीच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले. राज ठाकरे यांनी 2006 साली शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली होती. तेव्हापासूनच हे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र कधी येणार? असा सवाल सातत्याने विचारला जात होता. 

बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावं अशी वारंवार इच्छा प्रकट केली होती. पण ते शक्य झालं नव्हतं. कौटुंबिक समारंभ, उद्धव ठाकरेंचं आजारपण या गोष्टी वगळता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गेल्या 18 वर्षात राजकीय व्यासपीठावर समान भूमिका घेऊन कधीही एकत्र आले नव्हते. पण अखेर आज (5 जुलै 2025) आवाज मराठीचा असं म्हणत दोन्ही बंधू एकत्र आले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या मनातलं चित्र आज सत्यात उतरल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

बाळासाहेबांच्या मनातील चित्र, अखेर कॅमेऱ्यात कैद

याच पार्श्वभूमीवर शिवसेना UBT पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक अत्यंत बोलका असा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याचा एकत्रित असा फोटो आहे. ज्यामध्ये दोघाही भावांनी हात उंचावून समोर जमलेल्या लोकांना अभिवादन करत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp