Viral News : बिहारच्या समीस्तीपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नात्याला काळिमा फासणारं, सामाजिक परंपरा आणि पंचायतीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, पुसा पोलीस ठाणे परिसरातून एक प्रकरण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला. भाऊ-बहिणीच्या नात्याला लाज आणणारा प्रकार उघडकीस आला. किशोरवयीन मुला-मुलीने प्रेमप्रकरणातून कथितरित्या विवाह केला. नंतर ग्रामपंचायत बोलावण्यात आली आणि दोघांना कथितरित्या अमानुषपणे शिक्षा सुनावून ग्रामस्थांनी गावातून हकलून दिले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबई लोकलमध्ये मर्डर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी उचललं
भाऊ-बहिणींचे एकमेकांवर प्रेमसंबंध
एकाच कुटुंबातील चुलत भाऊ-बहिणींचे एकमेकांवर प्रेमसंबंध होते. लहानपणापासून ते एकत्रित राहत होते, नंतर काळानुसार त्यांचे नाते अधिक घट्ट होऊ लागले होते. घरातील कोणत्याही व्यक्तीला याबाबत कसलीही माहिती नव्हती. सुमारे काही महिन्यांपूर्वी ते घर सोडून गेले आणि त्यांनी विवाह केल्याचा आरोप केला. कुटुंबीयांना हे समजले असता, त्यांनी घरी परत बोलावले.
ग्रामस्थांनी दोघांचेही केस कापून दिली शिक्षा
गावात आल्यानंतर कुटुंब आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत पंचायत बोलावण्यात आली होती. पंचायतीत, दोघांना स्वतंत्रपणे त्यांच्या इच्छांबाबत विचारण्यात आले, परंतु दोघांनीही एकत्र राहण्याची आणि आपले संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याची इच्छा व्यक्त केली. पंचायत झाल्यानंतर दोघांनाही मारहाण केली. त्यांच्या डोक्यावरील केस कापण्यात आले. इतकंच नाही, तर गाव सोडून जाण्याचा आदेश देण्यात आल्याचा आरोप आहे.
मुलगी म्हणाली की, मला विचारलं की, मी माझ्या आई वडिलांसोबत राहणार की त्या मुलासोबत राहणार. तेव्हा तिनं त्याच्यासोबत राहणार असल्याचं सांगितलं. नंतर दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. केस कापण्यात आले आणि गावातून हकलून देण्यात आलं.
हे ही वाचा : गेस्ट हाऊसमध्ये एक महिला आणि 6 पुरूष, 'नको तसलं' रॅकेट अन्..
पुसा पोलिसांनी सांगितलं की, संबंधित प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, दोन्ही पक्षांपैकी कोणीही औपचारिक तक्रार दाखल केली नाही. पीडितांचे जबाब घेतल्यानंतर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











