Crime News : दक्षिण दिल्लीत माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नराधमाने फुटपाथवर कुटुंबासोबत झोपलेल्या 11 वर्षीय मुलीचं अपहरण केलं, नंतर तिच्यावर कथितरित्या लैंगिर अत्याचार करण्यात आला. नंतर तिची हत्या करून तिला फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार दक्षिण दिल्लीच्या मेहरोली परिसरात घडला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भाच्याने आत्याचे पाय कापले, दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला अन्..
फुटपाथवर झोपलेल्या तरुणाला उचलून नेलं अन्..
पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासोबत महारोली परिसरातील फुटपाथवर झोपली होती. सोमवारी पहाटे 5 वाजता आरोपीने तिला उचलून नेत अपहरण केलं. सकाळ होताच कुटुंबीयांना मुलगी गायब झाल्याचं समजलं असता, त्यांनी पोलिसांकडे जाऊन माहिती दिली होती.
पीसीआरमधून आरोपीची कॉल हिस्टरी तपासण्यात आली असता, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाली, नंतर तात्काळपणे प्रकरणाची माहिती मिळवली. सुरुवातीला एका कॅब चालकने मुलीला नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवत शोध घेतला. हरियाणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लावण्यात आलेल्या डझनभर सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची तपासणी करण्यात आली. तेव्हा तांत्रिक पुरावे आणि स्थानिक पातळीवर गोळा केलेल्या माहितीच्या आधारे, पोलीस तपासातून आरोपीची ओळख समोर आली.
हे ही वाचा : धुळे: साक्री तालुक्यात पावसाचा कहर, वीज कोसळून 40 मुक्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू
सोमवारी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
दरम्यान, मुलीचा मृतदेह हा दिल्ली-गुरूग्राम सीमेनजीक एका वनक्षेत्रात आढळून आला. संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असता, शवविच्छेदनाच्या अहवालातून मृत्यूचे खरे कारण आणि महत्त्वाच्या बाबी समोर येतील, असा पोलिसांना विश्वास व्यक्त आहे. अशातच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. नंतर सोमवारी रात्री उशिरापणे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT











