कबड्डी प्रशिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सरावाला बोलवायचा अन्...

एका कबड्डी प्रशिक्षकाने अल्पवयीन कबड्डीपटूचा लैंगिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. चेन्नईमधील या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 12:37 PM • 27 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

कबड्डी प्रशिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

point

सरावाला बोलवायचा अन्...

Crime News : एका कबड्डी प्रशिक्षकाने अल्पवयीन कबड्डीपटूचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्या प्रशिक्षकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महिला पोलिसांनी राजू नावाच्या या प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या हा आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तमिळनाडूची राजधानी चेन्नईमधील हे प्रकरण आहे.

हे वाचलं का?

सराव सत्रादरम्यान लैंगिक छळ

तक्रारीनुसार, सराव सत्रादरम्यान या अल्पवयीन मुलीला वारंवार लैंगिक छळाला सामोरे जावे लागत होते. आरोपी प्रशिक्षकाने तिला धमकावले आणि स्वतःला सहकार्य करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांच्यातील लैंगिक शोषणाची या महिन्यातील ही दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे.

हे ही वाचा : “...तर सेवेचा राजीनामा द्या आणि”, राज ठाकरेंनी नांगरे पाटलांना सुनावलं

महाराष्ट्रातही छळाचे प्रकरण

यापूर्वी, याच महिन्यात महाराष्ट्रात एका 17 वर्षीय मुलीने फुटबॉल प्रशिक्षकावर क्रीडा क्षेत्रात करिअर घडवण्याचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अभिजित मंडल या 36 वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाला अटक केली होती. आरोपी मंडल हा वसईचा रहिवासी असून तो त्या भागात एक खाजगी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र चालवत होता.

हे ही वाचा : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल, शिंदेंच्या 'त्या' खासदाराला लॉटरी लागणार?

तीन वर्ष लैंगिक अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 2023 मध्ये प्रशिक्षणासाठी मंडलकडे गेली होती. सुरुवातीला तिचा विश्वास संपादन करून मंडलने पुढील तीन वर्षांत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, पीडितेने त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने अत्याचाराचे व्हिडिओ आणि फोटो काढून तिला धमकावण्यास सुरुवात केली होती, असेही तपासात समोर आले आहे.