'राजा राजा असतो, प्रजा प्रजा असते' फेसबुक लाइव्ह करत मर्डर...

मुंबई तक

26 Jun 2026 (अपडेटेड: 26 Jun 2026, 01:08 PM)

एका हॉटेलमध्ये पाच मित्रांनी मिळून आपल्याच बिझनेसमन मित्राचा खून केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर फेसबुक लाइव्ह करत त्यांनी याची माहिती दिली. जयपूरमधील या घटनेत नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राजा राजा असतो, प्रजा प्रजा असते

point

फेसबुक लाइव्ह करत मर्डरची माहिती,

point

काय आहे प्रकरण?

Crime News : मैत्री, दारुची पार्टी आणि त्यानंतर झालेल्या एका थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. पाच मित्रांनी मिळून आपल्याच एका जिवाभावाच्या मित्राची आणि शेअर मार्केट व्यावसायिक गुरुप्रसाद चौधरी याची हॉटेलच्या खोलीत निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, या गुन्ह्यानंतर फरार होताना आरोपींनी चक्क फेसबुक लाईव्ह करून आपल्या कृत्याची जाहीर कबुली दिली. गुरुप्रसाद चौधरी हा गेल्या दोन दिवसांपासून आपल्या मित्रांसह नारायण विहार येथील 'हॉटेल एसआर'मध्ये थांबला होता. राजस्थानच्या जयपूर परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

रात्री बारा वाजता काय दिसलं?

हॉटेलच्या खोलीत उशिरापर्यंत या मित्रांची पार्टी सुरू होती. पार्टी संपल्यानंतर सर्व मित्र खोलीबाहेर पडले आणि गुरुप्रसाद खोलीत एकटाच थांबला होता. रात्री 12 च्या सुमारास हॉटेलमधील कर्मचारी खोलीकडे गेले असता त्यांना दरवाजा उघडा दिसला. कर्मचाऱ्यांनी आत जाऊन पाहिले असता बेडवर गुरुप्रसादचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. त्याचे शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि बेडशीट देखील रक्ताने भरलेली होती. तसेच गंभीर जखमांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्याला मान्सून झोडपणार, 'या' 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट

राजा हा राजा असतो..

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात चक्रावून टाकणारी बाब म्हणजे आरोपींची बेधडक वृत्ती. हत्या केल्यानंतर पळून जाताना आरोपींनी फेसबुक लाईव्ह सुरू केले, ज्यामध्ये राजेश कुमावत उर्फ राजू, सुरेश गुर्जर, गौरीशंकर आणि श्रवण कुमावत हे आरोपी दिसत होते. या व्हिडिओमध्ये आरोपी उघडपणे, 'गुरु भाईला झोपेतच मारले... राजा हा राजा असतो आणि प्रजा ही प्रजा असते', असे बोलताना दिसले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि एफएसएलच्या पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. पार्टीदरम्यान झालेल्या वादातूनच नशेत असलेल्या मित्रांनी झोपलेल्या गुरुप्रसादवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हे ही वाचा : समजून घ्या: ठाकरेंच्या खासदारांनंतर आता नंबर नगरसेवकांचा? निधी वाटपातला भेदभाव पाहा!

आरोपी फरार

आरोपींनी गुन्ह्यानंतर नशेत फेसबुक लाईव्ह केले असले, तरी नंतर त्यांनी ते डिलीट केले; मात्र तत्पूर्वीच मृताच्या नातेवाईकांनी या लाईव्हचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून पोलिसांना सोपवले. तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की, ज्या हॉटेलमध्ये हे हत्याकांड घडले, ते हॉटेल मुख्य आरोपी सुरेश गुर्जर याचा भाऊ मुकेश याचे आहे. पोलिसांनी वैद्यकीय मंडळाच्या देखरेखीखाली मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून, सध्या फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.