Crime News : बिहारमध्ये महिला आणि मुलींच्याविरोधात सातत्याने लैंगिक अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. अशाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तरुण घरात शिरला आणि त्याने महिलेचा ब्लाउज फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील लालगंज ठाणे परिसरातील आहे. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेनं परिसर हादरून गेला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : नवरात्रीदरम्यान चार ग्रहांची वक्री गती, 'या' राशींचे भाग्य बदलेल
घरात घुसून पीडितेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न
संबंधित प्रकरणात पीडित महिलेनं दावा केला की, ती घरात आपल्या मुलाला औषध देत होती. यादरम्यान पोखर गावातील दिनेश सिंह, अवधेश सिंह, दोघांचेही वडील गोनौर सिंह, मिशु कुमार, आशु कुमार पती दिनेश सिंह आपल्या हातात लाकडी दांडा, लोखंडी रॉड घेऊन पीडित महिलेच्या दरवाजावर पोहोचला आणि शिवीगाळ करू लागला. दारूच्या नशेत असलेल्या अवधेश सिंहने घरात घुसून पीडितेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
पीडितेचा ब्लाउज ओढून फाडल्याचा आरोप
पुढे त्याने पीडितेचा ब्लाउज ओढून फाडला होता. पीडितेनं आपले स्वत:चे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला असता अवधेश सिंहने मारहाण केली, नंतर त्याने तिच्या घरातील सात लाख रुपये काढले. महिलेच्या माहितीनुसार, संबंधित पैसे हे नुकतेच विकलेल्या जमिनीचे होते. याचदरम्यान महिलेला वाचवण्यासाठी त्याचे सासरे लक्ष्मण सिंह घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींनी त्याच्यासोबत मारहाण केली. अवधेश सिंहने पीडितेच्या सासऱ्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सासऱ्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती.
हे ही वाचा : पुणे : 10 वर्षांची मुलगी मंदिरात दर्शनासाठी एकटीच आली, नराधमाला दिसली अन्
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्ह्याची पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. महिलेचा पती हा पुण्यात नोकरीसाठी असतो, याचाच गैरफायदा घेण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची पुढील कारवाई केली जात आहे.
ADVERTISEMENT












