नागपूर: नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या पॅराडाईज हॉटेलमध्ये एका आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हे रॅकेट दिल्लीतून चालवले जात होते आणि त्यात परदेशी मुलींचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एका गुप्त माहितीवरून पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.
ADVERTISEMENT
माहितीनुसार, हे हॉटेल महिन्याला अडीच लाख रुपयांना भाड्याने दिले जात होते. येथे रशिया, उझबेकिस्तान आणि इतर देशांतील मुलींना बोलावून काही खास ग्राहकांना सेवा दिली जात होती.
हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बनावट ग्राहक म्हणून एका पोलिसाला हॉटेलमध्ये पाठवले. त्याने प्रथम 2000 रुपये जमा केले आणि नंतर उझबेकिस्तानच्या मुलीला बोलावण्यासाठी 5500 रुपये दिले.
हे ही वाचा>> 29 वर्षीय पुजाने 'असे' ठेवलेले मोठ्या दिरासोबत अनैतिक संबंध.. मोठ्या वहिनीने सांगितली सगळी कहाणी
यानंतर, परदेशी मुलीला खोलीत पाठवताच पोलिसांनी पथकासह हॉटेलवर छापा टाकला. उझबेकिस्तानमधील 23 वर्षीय मुलीची घटनास्थळावरून सुटका करण्यात आली आणि रॅकेट चालवणारी महिला रश्मी आनंद खत्री हिला तात्काळ अटक करण्यात आली.
पोलिसांनी केली अनेक परदेशी मुलींची सुटका
पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की, हे रॅकेट दिल्लीतील कृष्ण कुमार उर्फ राधे देशराज नावाचा व्यक्ती मागील अनेक दिवसांपासून चालवत होता. तो वेगवेगळ्या देशांतील मुलींना टुरिस्ट व्हिसावर भारतात बोलावून त्यांना वेश्याव्यवसाय करायला लावण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात पाठवत असे.
हे ही वाचा>> टीचरची डर्टी स्टोरी! 'वय बघू नको, आज-काल हे चालतं...', 38 वर्षीय शिक्षिकेच्या जाळ्यात अकरावीतील मुलगा 'असा' अडकला
सध्या कृष्ण कुमार फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे मुलीची सुटका करण्यात आली असून आणि पुढील कारवाई सुरू आहे.
नागपूरसारख्या शहरात अशाप्रकारचा गोरखधंदा सुरू असल्याचं उजेडात आल्यानंतर आता नागपूरकरांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण या गोष्टींमुळे शहराच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचं नागपूरकरांनी मत व्यक्त केलं आहे.
ADVERTISEMENT
