टीचरची डर्टी स्टोरी! 'वय बघू नको, आज-काल हे चालतं...', 38 वर्षीय शिक्षिकेच्या जाळ्यात अकरावीतील मुलगा 'असा' अडकला
मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनेक दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आता या सगळ्या प्रकरणाची नेमकी कहाणी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: डिसेंबर 2023 मध्ये शाळांमध्ये वार्षिक समारंभाची तयारी जोरात सुरू होती. मुंबईच्या त्या इंटर कॉलेजमध्येही असेच वातावरण होते. समारंभात सहभागी होणारी मुलं आपापल्या शोचा सराव करण्यात व्यस्त होती. अकरावीत शिकणाऱ्या मुलाची ग्रुप डान्ससाठी निवड झाली होती, जिथे पहिल्यांदाच त्याच्या शाळेतील महिला शिक्षिकेने त्याला पाहिले. शिक्षिका त्याच्या जवळ गेली आणि त्याच्याशी बोलू लागली आणि नंतर दररोज कोणत्या ना कोणत्या बहाण्याने ती त्याला भेटू लागली.
विद्यार्थ्याला वाटले की, टिचरने इतक्या मैत्रीपूर्ण पद्धतीने बोलणे हे सामान्य आहे, पण शिक्षिकेच्या मनात काहीतरी वेगळंच होती. खरंतर, शिक्षिकेला या विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवायचे होते. सुरुवातीला या गोष्टीला विद्यार्थ्याने नकार दिला, पण अचानक असं काही घडलं की तो शिक्षिकेच्या तावडीत अडकला आणि तब्बल एक वर्ष शिक्षिका त्यांचं लैंगिक शोषण करत राहिली. ही संपूर्ण कहाणी काय होती, हे आम्ही तुम्हाला नेमकेपणाने सांगू.
हे ही वाचा>> वयात येणारी मुलं, हॉटेल.. आणि 'या' 5 महिला शिक्षिकेंच्या वासनेची कहाणी, विद्यार्थ्यांसोबत शरीर संबंध अन्...
ही धक्कादायक कहाणी आहे मुंबईतील. जिथे महिला शिक्षिकेने तिच्याच अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. शिक्षिकेच्या एका मैत्रिणीनेही तिला या घृणास्पद कृत्यात साथ दिल्याचं आता समोर आलं आहे. सुरुवातीला शिक्षिका ही विद्यार्थ्याला फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये नेलं, त्यानंतर तिने त्याला दारू पाजली आणि नंतर त्यासोबत लैंगिक अत्याचार केले. हा सगळा प्रकार वर्षभर सुरू होता. पण आता शिक्षिका आणि तिच्या मैत्रिणीच्या अटकेनंतर या प्रकरणी अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
नेमकी कशी झाली सुरुवात?
16 वर्षीय मुलगा त्यावेळी अकरावीमध्ये शिकत होता. वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाची तयारी करत असताना, 38 वर्षीय शिक्षिका त्याला भेटली आणि तिने त्याच्याशी बोलणं सुरू केलं. एके दिवशी तिने त्याला तिच्या मनातील छुपी इच्छा बोलून दाखवली, ज्यासाठी खरं तर ती त्याच्या जवळ येत होती. पण शारीरिक संबंधाला विद्यार्थ्याने स्पष्टपणे नकार दिला आणि त्यानंतर त्याने शिक्षिकेशी बोलणेही बंद केले. पण, विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचेच यासाठी शिक्षिका काहीही करायला तयार होती. त्यामुळे तिने विद्यार्थ्याला फसवण्यासाठी आणखी एक योजना आखली.
हे ही वाचा>> 'त्या' महिला नेमक्या कोण ज्या हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्यांसोबत करायच्या नको ते...
शिक्षिकेने घेतली एका मैत्रिणीची मदत, अन्...
विद्यार्थ्याला लैंगिक संबंध ठेवावेत यासाठी शिक्षिकेने एक युक्ती केली. तिने विद्यार्थ्याच्या एका मैत्रिणीची निवड केली, जी त्याच्या अत्यंत जवळची होती. या मैत्रिणीने त्याला एकट्याला बोलावलं आणि सांगितलं की, 'किशोरवयीन मुलांचे मोठ्या महिलांशी प्रेमसंबंध असणे ही एक सामान्य गोष्ट आहे.' ती त्याला हे देखील म्हणाली की, 'वय पाहू नको, आजकाल हे सर्व चालतं.' त्यानंतर ती मैत्रीण दररोज त्या विद्यार्थ्याला भेटायची आणि फक्त शिक्षिकेबद्दलच बोलायची. ती त्याला असंही म्हणाली की, देवाने तुम्हाला एकमेकांसाठी बनवले आहे. हळूहळू विद्यार्थी या मैत्रिणीच्या बोलण्यात गुरफटला.
शिक्षिका आणि विद्यार्थ्याची एकांतात भेट
शेवटी, या मैत्रिणीच्या बोलण्याने प्रभावित होऊन विद्यार्थ्याने त्याच्याच शिक्षिकेशी अनैतिक संबंध ठेवण्यास सहमती दर्शवली. एके दिवशी, शिक्षिकेने विद्यार्थ्याला कॉलेजजवळ भेटायला बोलावलं. नंतर स्वत:च्या कारमध्ये बसून तिने त्याला एका निर्जन स्थळी नेलं. तिथे, तिने प्रथम विद्यार्थ्याचे कपडे काढायला लावले आणि नंतर त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवले. त्या दिवसापासून, हे जवळजवळ दररोज घडू लागलं. ती विद्यार्थ्याला एकांतात भेटायची आणि तिला जे हवे ते मनमानी पद्धतीने त्याच्यासोबत करायची.

5 स्टार हॉटेलमध्ये लैंगिक शोषण
काही काळानंतर, शिक्षिका ही विद्यार्थ्याला फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली. तिने फाइव्ह स्टार हॉटेल्स यासाठी निवडली कारण येथे अविवाहित जोडप्यांसाठी बुकिंग सहज उपलब्ध होते आणि कोणत्याही प्रकारची भीती नसते. येथे, शिक्षिका प्रथम विद्यार्थ्याला दारू पाजायची आणि नंतर त्याला स्वत:च्या वासनेचा बळी बनवायची. या सगळ्या प्रकाराने विद्यार्थी अक्षरश: घुसमटून गेला होता. आता त्याला या अनैतिक संबंधातून बाहेर पडायचं होतं. त्याच्यावर झालेले लैंगिक अत्याचार यामुळे तो विचित्र वागू लागला. जेव्हा शिक्षिकेला हे सगळं दिसू लागलं तेव्हा तिने त्याला अँटी एन्झायटी पिल्स द्यायला सुरुवात केली.
कॉलेज संपल्यानंतरही शिक्षिकेने त्याला एकटं सोडलं नाही
वेळ हळूहळू जात होता आणि बारावीच्या परीक्षा येणार होत्या. विद्यार्थ्याला वाटले होते की, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जेव्हा तो कॉलेज सोडेल तेव्हा त्याला शिक्षिकेच्या तावडीतून मुक्तता मिळेल. पण, तसे झाले नाही. शिक्षिका ही विद्यार्थ्यासोबतच्या शारीरिक संबंधासाठी चटावली होती. त्यामुळे ती कोणत्याही किंमतीत त्याला सोडण्यास तयार नव्हती. कॉलेज संपल्यानंतरही शिक्षिकेने तिच्या घरातील कर्मचाऱ्यांमार्फत विद्यार्थ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण, विद्यार्थाला आता ही गोष्ट सहन होत नव्हती. अखेर एका क्षणी त्याने जो काही प्रकार सुरू होता त्याबाबतची सगळी कहाणी त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितली.
पोलिसांच्या तावडीत महिला शिक्षिका
जेव्हा विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबातील लोकांना याबाबत सांगितलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या धक्क्यातून सावरल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. तक्रारीनंतर पोलिसांनी महिला शिक्षिका आणि तिच्या मैत्रिणीला अटक केली.
पोलिसांनी दोघींविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवले होते त्या महिला शिक्षिकेची गाडीही जप्त करण्यात आली आहे. महिला शिक्षिकेची मानसिक चाचणी करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. तिने इतर कोणत्या विद्यार्थ्यांना आपला बळी बनवले होते का याचाही आता पोलीस तपास करत आहेत.
मोबाइल-लॅपटॉपवरून उघड होतील इतरही गुपितं
दुसरीकडे, शाळा व्यवस्थापनाने शिक्षिकेला निलंबित केले आहे. व्यवस्थापनाने एक निवेदन जारी केले आहे की, ते या प्रकरणात पोलिसांना पूर्ण मदत करतील. शिक्षिकेवर विद्यार्थ्याला धमकावल्याचाही आरोप आहे. शिक्षिकेच्या मोबाइल फोन आणि लॅपटॉपमधून पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. यावरून असे दिसून आले आहे की ती विद्यार्थ्याला बराच दिवसांपासून अडकविण्याचा प्रयत्न करत होती.