वयात येणारी मुलं, हॉटेल आणि 'या' 5 महिला शिक्षिकेंच्या वासनेची कहाणी, विद्यार्थ्यांसोबत शरीर संबंध अन्...
Crime news: मुंबईतील एका प्रतिष्ठीत शाळेतील महिला शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्याशी जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. ही घटना केवळ मुंबईतच घडली नाही,तर अशा अनेक घटना या देशातील काही राज्यांमध्ये घडलेल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महिलेनं विद्यार्थ्याला शारीरिक संबंध ठेवण्यास केली जबरदस्ती

मुंबईसह 'या' राज्यात विद्यार्थी-शिक्षिकेच्या नात्याला काळीमा
Crime News: मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेत एका 40 वर्षीय महिला शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केले होते. शिक्षिकेचा त्या विद्यार्थ्यावर जीव जडला होता. जानेवारी 2024 मध्ये तिने तिच्या विद्यार्थ्याला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली होती. विद्यार्थ्याने शिक्षिकेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिक्षिकेनं संबंधित विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
हेही वाचा : मोठ्या दिराकडून गरोदर.. सासऱ्यासोबत शरीर संबंध, अनैतिक संबंधांना चटावलेल्या पुजाचे भयंकर कारनामे!
ती महिला शिक्षिका विद्यार्थ्याला महागड्या पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची. त्याला मद्यप्राशन करण्यास जबरदस्ती करायची. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला गुंगीचे औषध देत असे. त्यानंतर तो तसाच शांतपणे बेशुद्ध अवस्थेत पडून राहायचा. गेली वर्षभर हा सर्व प्रकार सुरूच होता.
रोजच्या या छळाने विद्यार्थ्यांच्या वागणुकीत बदल झाला होता, पण सुरूवातील त्यानं याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला तेव्हा त्याने शाळा सोडली. महिला शिक्षिका संबंधित विद्यार्थ्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्याला अनेक फोन कॉल्स केले. मात्र, पीडित विद्यार्थ्याने महिला शिक्षिकेच्या फोन कॉल्सला उत्तर दिले नाही. त्यानंतर तिने आपल्या नोकराच्या मदतीने आपला संदेश पीडित विद्यर्थ्याच्या घरी पोहोचवला होता.
यानंतर पीडित विद्यार्थ्याने त्याच्या कुटुंबाला वर्षभरापासूनचा सर्व अनुभव सांगितला. त्यानंतर त्याच्या पालकांनी महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिला शिक्षिकेविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा एकच नसून अनेक घटना घडलेल्या दिसून येत आहेत.