मोठ्या दिराकडून गरोदर.. सासऱ्यासोबत शरीर संबंध, अनैतिक संबंधांना चटावलेल्या पुजाचे भयंकर कारनामे!
Crime News : उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये पूजा नावाच्या महिलेनं पतीनंतर आपल्या दीरासोबत लिव्ह इनमध्ये राहून शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तिने सासऱ्यालाही सोडलं नाही. सासऱ्यासोबत संबंध ठेवण्याचा तिने प्रयत्न केला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सूनेनं केला सासूचा खून

पोलिसांच्या तपासातून मोठा माहिती समोर
Crime News : उत्तर प्रदेशातील झांसी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये पोलीस एका हत्येचा तपास करत आहेत. याच तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत सून पूजा जाटावने आपल्या पतीचा खून केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तिने सासूचा खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी तिचा पाठलाग करून पूजाला ताब्यात घेतलं.
हेही वाचा : Infosys चा ऑफिसमध्ये कर्मचाऱ्याचा भलताच कांड, कमोडवर चढून शूट करायचा तरूणीचे अश्लील Video
दीरासोबत संबंध ठेवण्याचे कारण आलं समोर
पूजाचा पहिला विवाह हा ग्वाल्हेर येथे झाले होते. तिथं तिला कौटुंबिक हिसाचाराचा सामना करावा लागला होता. तिच्या पहिल्या पतीने तिच्यावर गोळीबार केला होता. पण दैवबलवत्तर ती वाचली, यानंतर पूजाचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला. पण न्यायालयात जाताना पूजाची भेट सुशीला देवीचा धाकटा मुलगा कल्याणशी झाली. कल्याण आणि पूजाची मैत्री झाली. त्यांनंतर त्यांचं बोलणं वाढू लागलं. मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर हे नात्यात झालं. त्यानंतर दोघेजण लिव्ह इनमध्ये राहू लागले.
मात्र, पुन्हा एकदा पूजाच्या आयुष्यात वादळ आलं, कल्याणचा अपघातात मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा नियतीनं पूजाचं प्रेम हिरावून नेलं. कल्याणचा मोठा भाऊ संतोषने आणि त्याच्या कुटुंबियांनी तिला आपल्या घरी आणले. त्यानंतर पूजाने पुन्हा संतोषसोबत अनैतिक संबंध ठेवले.
संतोषसोबत होते लिव्ह इन रिलेशनशिप
कल्याणच्या घरी पूजा आल्यानंतर तिने संतोषशी संबंध ठेवले. पूजा ही त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर तिनं तिच्या सासऱ्यांशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, पूजाला आणि संतोष बाळ झाल्याची माहिती समोर आली. पूजाचे आणि तिच्या पतीशी असलेलं संबंथ पाहूण संतोषची पत्नी नाराज व्हायची. तिने अनेकदा निषेधही केला, त्यानंतर पूजाने वेगळं राहायचं असल्याची मागणी केली. तसेच एकूण जमिनीतील अर्ध्या हिस्स्याची मागणी केली.
जमिनीचा अर्ध्या हिस्स्याची मागणी
कुटुंबाकडे प्रत्यक्षरित्या 18 एकर जमीन होती. पूजाने यापैकी अर्ध्या जमिनीची मागणी केली. म्हणजेच 8 एकर जमिनीची मागणी केली. संतोष आणि सासरे तिच्या सासऱ्यांनी या मागणीला सहमती दर्शवली होती. पण सासूने विरोध केला असता, तिने सासूचाच खून केला.
हेही वाचा : पुणे हादरलं! कुरिअर बॉय म्हणून सोसायटीत घुसला, तरूणीवर बलात्कार करून तिच्याच मोबाइलमध्ये काढला सेल्फी!
पूजाने तिच्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराला तिच्या सासूच्या घरी पाठवले. त्यानंतर त्यांनी सासूचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. सुशील देवीकडे म्हणजेच सासूकडे 8 लाखांचे दागिनेही होते. कामनी आणि तिच्या प्रियकराने हे दागिने काढून घेतले.
दरम्यान, सासूच्या अंत्यसंस्काराचे काम सुरु असताना ती अचानकपणे तिथून निघून गेली. त्यावेळी पोलिसांना पूजावरच संशय आला. त्यावेळी पोलिसांनी तिला अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणात पूजा जाटवालला पोलिसांनी ताब्यात घेतलं.