पुणे हादरलं! कुरिअर बॉय म्हणून सोसायटीत घुसला, तरूणीवर बलात्कार करून तिच्याच मोबाइलमध्ये काढला सेल्फी!

मुंबई तक

Pune Crime News : कुरिअर बॉय अशी खोटी ओळख सांगून तरुणाने तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. 

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील कोंढवामध्ये तरुणीचं लैंगिक शोषण

point

पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची माहिती

Pune Crime News : कुरिअर बॉय अशी खोटी ओळख सांगून तरुणाने तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. एका हायक्लास सोसायटीत राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण करण्यात आले आहे. ही घटना 2 जुलै रोजी बुधवारी घडली असून कोंढवा हादरून गेलं आहे. या घटनेची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. 

हेही वाचा : 'फ्लॅट का घेत नाही?' पत्नी सारखं-सारखं तेच विचारायची, पतीने जे केलं ते वाचून तुमचाही होईल थरकाप

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी सांगितलं की, कोंढव्यातील एका हायक्लास सोसायटीत ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीनं स्वत: कुरिअर बॉय असल्याची माहिती सांगितली आणि तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यामुळे आता पुण्यातील महिला आणि तरुणींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. 

आरोपीच्या तपासासाठी 10 पथकं तैनात 

संबंधित आरोपीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एकूण 10 पथकं शोधमोहिमेसाठी तैनात केली आहेत. दरम्यान, पीडित तरुणी आणि तिचा भाऊ हे कोंढव्यात राहतात. पीडित तरुणीही मूळची अकोल्याची असल्याची माहिती समोर आली आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीत कार्यरत आहे, अशी माहिती उपायुक्त पोलीस राजकुमार शिंदे यांनी दिली.

नराधमाने कुरिअरबाबत खोटे सांगितले आणि तरुणीला वासनेचं शिकार बनवलं. यावर पोलिसांनी सांगितलं की, तरुणीने संबंधित कुरिअर आपले नसल्याचे सांगितलं, पण तरीही नराधमाने तिला सही करण्यास सांगितली. तेव्हा तिने सेफ्टी डोअर उघडला असता, त्याने तरुणीच्या चेहऱ्यावर केमिकल स्प्रे मारला आणि तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर तरुणीसोबत नको तेच घडलं.

तरुणीवर बलात्कार करणाऱ्या बनावट कुरिअर बॉयचं धाडस पाहून पोलिसांसह हैराण झाले आहेत. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने महिलेच्या मोबाइलमध्ये सेल्फी देखील काढला. त्यानंतर त्याने त्यावर 'मी परत येईन' असा मेसेजही टाइप केला.

हेही वाचा : गर्लफ्रेंड म्हणाली, 'शारीरिक संबंध नको..' बॉयफ्रेंड चिडला अन् भलतंच काही तरी करून बसला!

ही घटना एका हायक्लास सोसायटीत घडल्याने सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. दरम्यानस पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती आता समोर आली आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp