Pune: 'फ्लॅट का घेत नाही?' पत्नी सारखं विचारायची, पतीच्या कृत्याने पुणेकरही हादरले!

मुंबई तक

Pune Crime News : पुणे शहरातील बावधनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

फ्लॅटसाठी तगादा लावलेला पत्नीने, पतीने केली हत्या (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
फ्लॅटसाठी तगादा लावलेला पत्नीने, पतीने केली हत्या (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे शहरातील बावधनमध्ये धक्कादायक घटना

point

फ्लॅटची मागणी करणाऱ्या पत्नीची पतीकडून हत्या

Pune Crime News : पुणे शहरातील बावधनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव हे मनीषा प्रकाश जाधव असे आहे. तर हत्या करणाऱ्या पतीचं नाव प्रकाश जाधव असे आहे. प्रकाश जाधवने आपल्या पत्नीची हत्या करण्यामागचं कारण समोर आलं आहे. पत्नीने नवीन फ्लॅट घेण्याचा आपल्या पतीकडे हट्ट धरला होता. मात्र, पतीला हे शक्य झालं नसल्याने पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. 

हे ही वाचा : गर्लफ्रेंड म्हणाली, 'शारीरिक संबंध नको..' बॉयफ्रेंड चिडला अन् भलतंच काही तरी करून बसला!

नेमकी घटना काय?

प्रकाश हा तणावजन्य परिस्थितीचा सामना करत होता. तो एका शाळेच्या गाडीवर बस ड्रायव्हर म्हणून काम करत होता. मात्र, त्याची नोकरी गेल्याने तो चिंतेत आला. त्यानंतर तो रिक्षा चालवायचा. त्यातून मिळणाऱ्या एकूण पैशांतून कसंबसं घर चालवायचा. प्रकाश आणि त्याची पत्नी मनीषा यांच्यात काही कारणावरून वाद निर्माण झाला. मंगळवारी दुपारी प्रकाश जाधव रागाने लालबूंद झाला. त्याने आपली पत्नी मनीषाचा गळा दाबून हत्या केली. जेव्हा घरात कोणीही नव्हते तेव्हा प्रकाश त्या मृतदेहाजवळ बराच वेळ बसला होता. 

काही वेळानंतर त्यांचा मोठा मुलगा घरात आला. त्याने दरवाजा वाजवला, त्यानंतर दरवाजा उघडला जात नव्हता. अखेर दरवाजा उघडण्यात आला असता, मुलाने आपल्या आईला घरात मृत असल्याचे पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

हे ही वाचा : 'दीर आणि मेव्हण्यासोबत माझे संबंध...', महिलेच्या अनैतिक संबंधांची कहाणी ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

त्यावेळी मुलाने अॅम्बुलन्स आणण्यासाठी सांगितली. तेव्हा प्रकाशने तिथून पळ काढला. आरोप पती प्रकाश जाधवनेच हे क्रूकर्म केल्याची माहिती पोलिसांना कळताच बावधन पोलीस घटनास्थळी दाखल झाली. सोलापूरच्या दिशेने पळून गेलेल्या प्रकाशला पोलिसांनी अटक केली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp