29 वर्षीय पुजाने 'असे' ठेवलेले मोठ्या दिरासोबत अनैतिक संबंध.. मोठ्या वहिनीने सांगितली सगळी कहाणी

मुंबई तक

झासीमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय पूजाचे कारनामे पाहून सर्वचजण हादरून गेले आहेत. आपल्याच सासूच्या हत्येमागे पूजाचं नेमकं काय प्लॅनिंग होतं? याबद्दल काही नवीन खुलासे समोर आले आहेत.

ADVERTISEMENT

29 वर्षीय पुजाने 'असे' ठेवलेले मोठ्या दिरासोबत अनैतिक संबंध..
29 वर्षीय पुजाने 'असे' ठेवलेले मोठ्या दिरासोबत अनैतिक संबंध..
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सासूचीच हत्या करणाऱ्या पूजाची कहानी आली समोर

point

मोठ्या वहिनीने केला सगळ्याचा खुलासा

point

दिरासोबत ठेवले होते अनैतिक संबंध

Jhansi Pooja Jatav News: झासीमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय पूजाचे कारनामे पाहून सर्वचजण हादरून गेले आहेत. तिच्या भोळ्या आणि सुंदर चेहऱ्यामागे असं क्रिमिनल माइंड असेल, याचा कुणीच विचार केला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, सासू सुशीलाच्या हत्येच्या प्लॅनिंमध्ये पोलीस आणि कुटुंबातील सदस्यांपासून वाचण्यासाठी पूजाने तिचा पती संतोष आणि सासरे अजय प्रताप यांना आधीच ग्वालियरला बोलवून घेतले होते. त्यानंतर आपल्या सासूची हत्या करण्यासाठी तिने बहीण कामिनी आणि प्रियकर अनिल कुमारला सुद्धा बोलवून घेतले. कोणालाच संशय येऊ नये, म्हणून तिघे घरी चहा प्यायले आणि त्याच दरम्यान, सासू सुशीलाला नशेचं इंजेक्शन देण्यात आलं. तिची हत्या केल्यानंतर घरात ठेवलेले जवळपास 8 लाखांचे दागिने आणि रोख पैसे घेऊन आरोपी फरार झाले. 

पूजाचं क्रिमिनल माइंड

24 जून रोजी सुशीलाची हत्या करण्यात आली. त्यादिवशी मृतका म्हणजेच सुशीलाचे पती प्रताप राजपूत यांनी आपली मोठी सून रागिनी आणि आकाशच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर मोठी सून नव्हे तर लहान सूनेची बहीण कामिनी आणि तिचा प्रियकर अनिल वर्मा दोषी आढळले. 

पूजाने पोलिसांना काय सांगितलं? 

पोलिसांनी कामिनीला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान हत्या करण्यामागे पूजाचा हात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पूजाला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, पूजाने केलेले खुलासे सर्वांनाच चकित करून टाकणारे होते. पूजाने यापूर्वी सुद्धा तिच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केला होता आणि या आरोपाखाली ती तुरुंगात सुद्धा होती. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तिने आपल्या लहान दिरासोबत प्रेमसंबंध बनवले. यामध्ये तिचा लहान दिर म्हणजेच कल्याणसुद्धा तितकाच अपराधी होता. कल्याणचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. 

कल्याणच्या मृत्यूनंतर पूजा एके दिवशी रडत रडत तिच्या गावात पोहोचली आणि कुटुंबियांनी सुद्धा तिला स्वीकारलं. यादरम्यान, लग्न झालेल्या संतोषसोबत पूजाचे संबंध झाले आणि त्यातून एक मुलगी सुद्धा झाली. त्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळत गेलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp