Infosys Crime News : बंगळुरूला आपण आयटी हब नावाने ओळखते. मात्र, याच आयटी हब शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचे वॉशरूममधील व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. कर्मचाऱ्याने केलेल्या अशा कृत्याविरोधात आरोपी अटकेत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वप्नील अशोक माळी (वय 28) असे अटकेत असलेल्या तरुणाचे नाव आहे. तो आंध्र प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'फ्लॅट का घेत नाही?' पत्नी सारखं-सारखं तेच विचारायची, पतीने जे केलं ते वाचून तुमचाही होईल थरकाप
घटनेला पोलिसांचा दुजोरा
या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिसांनी माहिती दिली की, तो शौचालयाच्या कमोडवर चढला आणि त्याच्या मोबाईलने त्याने महिलेचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. रेकॉर्डिंग दरम्यान, स्वप्नीलची सावली समोरच्या दारावर पडली असता, महिलेला कोणीतरी असल्याचा संशय निर्माण झाला.
संबंधित प्रकरणातील डसीपी सारा फतिमा म्हणाल्या की, आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्याची फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, आम्ही गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
सूत्रांनी घटनेची दिली माहिती
या घटनेची सूत्रांनी माहिती दिली की, कंपनीच्या एचआर विभागाने या घटनेप्रसंगी हस्तक्षेप केला आणि आरोपीच्या मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ काढून घेतले. आरोपीच्या फोनमध्ये 50 हून अधिक व्हिडिओ आढळले. तरीही कंपनीच्या मॅनेजमेंट विभागाने माफीनामा लिहण्यास सांगितले. पण त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
हेही वाचा : गर्लफ्रेंड म्हणाली, 'शारीरिक संबंध नको..' बॉयफ्रेंड चिडला अन् भलतंच काही तरी करून बसला!
पीडितेच्या पतीला ही माहिती समजली असता, त्याने इन्फोसिस या कंपनीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर मंगळवारी त्याने इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच बुधवारी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
