Crime News : प्रेमात वेडे झालेले लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. प्रियकराच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका महिलेने आपल्या नवऱ्याची अशा रीतीने हत्या केली की सगळेच हादरुन गेले. या हत्येमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील एका खेड्यात ही घटना घडली. आरोपी महिलेचे माहेरातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्याच्या प्रेमात ही महिला इतकी वेडी झाली होती की तिने अतिशय वाईट रीतीने आणि बघणाऱ्याचा थरकाप उडेल अशा रीतीने आपल्या नवऱ्याची हत्या केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नाशिक : महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, ज्योतिषाला अटक; एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगून आलेला चर्चेत
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील कतरी या छोट्याशा गावात ही घटना घडली. गावातील पंकज यादव यांचा मृतदेह 15 मार्च रोजी त्यांच्याच घरात संशयास्पद स्थितीत आढळला होता. पंकजची पत्नी पिंकी देवी ऊर्फ मधु हिने सुरुवातीला ही आत्महत्या आहे असे सांगून बनाव रचला आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंकजच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी सखोल चौकशी केली. आणि या चौकशीतून असे सत्य बाहेर आले जे ऐकून पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली.
दातांनी लचके तोडले
पिंकी उर्फ मधु हिचे तिच्या माहेरच्या एका तरुणाशी अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी तिने कट रचला. पिंकीने प्रथम पंकजला अन्नातून विष दिले. तो बेशुद्ध पडू लागताच तिने त्याच्या गुप्तांगावर गंभीर वार केले. इतकेच नव्हे तर, रागाच्या भरात तिने पतीच्या शरीराचे दातांनी लचके तोडले.
हे ही वाचा : अकोला महानगरपालिकेत ठाकरे गटाला झटका, रात्री दोन वाजता जिल्हाध्यक्षांसह चार नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
तपासात धक्कादायक खुलासे
पंकज आणि पिंकीचा विवाह 2024 मध्ये झाला होता. पंकज कामानिमित्त बाहेर असायचा, याच काळात पिंकीचे प्रेमसंबंध जुळले. त्यांना एक वर्षाचे बाळही आहे, मात्र प्रियकराच्या सांगण्यावरून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. नावाजयपुर पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश कुमार यांनी सांगितले की, 'आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.' सध्या तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











