पत्नी गर्लफ्रेंडसोबत 'ती' गोष्ट नव्हती देत करू, पतीने सगळ्यांनाच टाकलं हादरवून...

Wife Murder Case: पत्नी आपल्या प्रेयसीसोबत बोलून देत नाही या रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमेठी जिल्ह्यात घडली आहे.

wife objected to husband talking to his girlfriend husband lured her to a field and murdered her

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: ग्रोक

मुंबई तक

• 09:42 PM • 17 Mar 2026

follow google news

अमेठी: उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे पती आणि त्याच्या प्रेयसीमधील सुरू असलेल्या गप्पांना पत्नीने विरोध केल्याने तिला स्वत:चा जीव गमवावा लागला. गर्लफ्रेंडशी बोलू दिलं जात नसल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केली असल्याची समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले असून या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ही संपूर्ण घटना गौरीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिगूर हृदयशाह गावात घडली. याच गावातील रहिवासी असलेल्या रेखा हिचे लग्न काही वर्षांपूर्वी भालेसुल्तन येथील रहिवासी असलेल्या मनशरमसोबत झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मनशरम आपल्या प्रेयसीच्या सतत संपर्कात होता आणि तिच्याशी वारंवार बोलत असे. जेव्हा ही गोष्ट पत्नी रेखाला समजली तेव्हा तिने या गोष्टीला बराच विरोध केला. तसंच पतीला असं करण्यापासून देखील वारंवार रोखले. या मुद्द्यावरून त्या दोघांमध्ये सतत वाद होत असत.

होळीच्या दिवशी माहेरी गेलेल्या पत्नीला शेतावर बोलावलं अन्...

होळीच्या दिवशी वाद विकोपाला गेला आणि रेखा नाराज होऊन माहेरी निघून गेली. यानंतर, आरोपी पतीने तिला 16 मार्च रोजी शेतावर भेटायला बोलावलं. पण त्यावेळी त्याच्या मनात दुसरंच काही होती. जेव्हा रेखा ही शेतात आली तेव्हा मनशरमने थेट तिच्या डोक्यात काठीने प्रहार करून तिला ठार मारले.

हे ही वाचा>> पाचवीतील मुलीवर अ‍ॅसिड हल्ला, तो नराधम कोण ज्यानं केल मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त?

हत्येनंतर, पती मनशरम याने गव्हाच्या शेतात रेखाचा मृतदेह टाकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला. रेखाच्या हत्येनंतर तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि तपास सुरू केला.

पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली 'ऑपरेशन चक्रव्यूह' अंतर्गत तपास अधिक तीव्र करण्यात आला. घटनेच्या रात्री आरोपीच्या दुचाकीला चलान लावण्यात आले होते. तेव्हा पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा सापडला. या माहितीच्या आधारे, पोलीस आरोपी पतीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले.

हे ही वाचा>> सातारा : कराडमध्ये भीषण अपघात; शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरले… कंटेनरच्या भरधाव वेगानं होत्याचं नव्हतं झालं

ऑपरेशन चक्रव्यूहमध्ये पोलिसांची मोठी कामगिरी

यानंतर, पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, 16 तारखेला महिलेचा मृतदेह एका शेतात आढळून आला, त्यानंतर तपासासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली. पुराव्यांच्या आधारे, आरोपी पतीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास केला जात आहे.

    follow whatsapp