वृद्ध पतीचं रक्त साफ करत होती पत्नी..., हॉस्पिटलमधील लाजिरवाणा व्हिडीओ व्हायरल अन्...

उत्तर प्रदेशातील लखनौमधील केजीएमयू रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पण सगळ्या प्रकरणाबाबत आता मोठा वाद निर्माण झाला आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.

wife kept cleaning the blood of her elderly husband

wife kept cleaning the blood of her elderly husband

मुंबई तक

17 Mar 2026 (अपडेटेड: 17 Mar 2026, 07:04 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वृद्ध पतीचं रक्त साफ करत होती पत्नी...

point

KGMU मधील लाजीरवाणा व्हिडीओ तुफान व्हायरल!

लखनौ: किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) रुग्णालयातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती रुग्णालयाच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसत असून, त्यांची वृद्ध पत्नी आपल्या पदराने आणि हाताने पतीच्या अंगावरील रक्त साफ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

हे वाचलं का?

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी हजारो कर्मचारी आणि डॉक्टर तैनात असतात, तिथे या वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी एकही रुग्णालय कर्मचारी किंवा वॉर्डबॉय धावून आला नाही. इतकेच नव्हे, तर आजूबाजूला असलेल्या बघ्यांनीही मदतीचा हात देण्याऐवजी केवळ उभे राहून हा सर्व प्रकार पाहिला. रुग्णालयाच्या आवारातच आरोग्य व्यवस्थेचे असे विदारक आणि असंवेदनशील चित्र समोर आल्याने सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा आणि प्रशासनाची बचावात्मक भूमिका

या प्रकरणाने गंभीर वळण घेतल्यानंतर केजीएमयू रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रुग्णालयाचे प्राध्यापक के. के. सिंह यांनी सांगितले की, घटनेच्या काही वेळ आधी रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला होता. या वादातून संतापलेले कर्मचारी काही काळासाठी तिथून निघून गेले होते आणि त्याच दरम्यान हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. मात्र, रुग्णाची प्रकृती गंभीर असताना केवळ वादाचे कारण सांगून कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकणे, ही गंभीर निष्काळजी असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : गैंरो पे करम, अपनों पे सितम! राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग, आमदारांनी गद्दारी केल्याने काँग्रेसची फजिती!

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये नेमकी कोणाची चूक आहे याचा तपास केला जात आहे. दोषी आढळणाऱ्या डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. तरीही, एका सरकारी रुग्णालयात वृद्ध रुग्णाला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडल्यामुळे उत्तर प्रदेशातील आरोग्य व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.

    follow whatsapp