'त्या' महिला नेमक्या कोण ज्या हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्यांसोबत करायच्या नको ते...

Female Teacher Shocking Viral News :  मुंबईची एक नामांकीत शाळा..40 वर्षीय महिला शिक्षिका आणि 16 वर्षांचा विद्यार्थी..टीचर शाळेत इंग्रजी शिकवायची..याचदरम्यान तिचं एका विद्यार्थ्यासोबत प्रेम जडलं.

(प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

(प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

मुंबई तक

03 Jul 2025 (अपडेटेड: 03 Jul 2025, 08:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिला शिक्षकांनी अल्पवयीन मुलांसोबत केलं धक्कादायक कृत्य..

point

गुजरातच्या सूरतमध्येही घडली होती भयंकर घटना..

point

अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये घेऊन जायच्या आणि..

Female Teacher Shocking Viral News :  मुंबईची एक नामांकीत शाळा..40 वर्षीय महिला शिक्षिका आणि 16 वर्षांचा विद्यार्थी..टीचर शाळेत इंग्रजी शिकवायची..याचदरम्यान तिचं एका विद्यार्थ्यासोबत प्रेम जडलं. त्यानंतर तिने जानेवारी 2024 मध्ये विद्यार्थ्याला शारीरिक संबंधांबाबत विचारलं. पण सुरुवातीला विद्यार्थ्याने या गोष्टीला नकार दिला आणि तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला. त्यानंतर शिक्षिकेनं तिच्या एका मैत्रिणीला कमी वयाच्या मुलांसोबत शारीरिक संबंध करण्याबाबत सांगितलं. लोक आजकाल अशाप्रकारचे संबंध करतात, ही सामान्य गोष्ट आहे, असं तिने मैत्रिणीला सांगितलं. त्यानंतर ती महिला तिच्या जाळ्यात अडकली. 

हे वाचलं का?

हॉटेलमध्ये करायच्या शारीरिक संबंध 

महिला टीचर त्या विद्यार्थ्याला महागड्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायची. तिथे त्याच्यासोबत शारीरिक संबंध करायची. एव्हढच नाही, तिने विद्यार्थ्याला बेशुद्ध करण्यासाठी अंमली पदार्थ आणि दारू पाजली. त्यानंतर विद्यार्थी त्याच्याच धुंदीत राहायचा आणि कोणालाही काहीच सांगत नव्हता. हा धक्कादायक प्रकार एक वर्षांपर्यंत सुरु होता.

हे ही वाचा >> Konkan Rain: मालवण, कुडाळमध्ये पूर.. सिंधुदुर्गातील पुराचे हे Video पाहून भरेल धडकी

मुलाच्या वागणुकीत झालेल्या बदलांबाबत त्याच्या कुटुंबियांना सजमलं. पण सुरुवातीला त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पीडित मुलाने दहावीची परीक्षा पास केली आणि नंतर शाळा सोडून दिली. त्यानंतरही शिक्षिका त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करायची. त्या मुलाचा प्रतिसाद न मिळाल्यास नोकराला घरी पाठवून त्याच्याशी संपर्क करायची. हा प्रकार मर्यादेच्या पलीकडे गेल्यावर विद्यार्थ्याने कुटुंबियांना सर्वकाही सांगितलं. त्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिक्षिकेविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुजरातच्या सूरतमध्येही घडली होती भयंकर घटना..

दरम्यान, गुजरातच्या सूरतमध्येही अशाचप्रकारची धक्कादायक घटना घडली होती. येथील एका 23 वर्षीय ट्यूशन टीचरने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याला पळवून नेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी चार टीम बनवल्या होत्या. शिक्षिका अटक झाल्यानंतर तिने पोलिसांना सांगितलं होतं की, ती विद्यार्थ्याच्या मुलाची आई होणार आहे. तिच्या पोटात पाच महिन्यांचं बाळ आहे.

हे ही वाचा >> वाल्मीक कराडच्या समर्थकाचं घृणास्पद कृत्य! मतिमंद मुलीवर केला अत्याचार अन्...

याच कारणामुळे ती विद्यार्थ्याला घेऊन पळाली होती. हरियाणाच्या रेवाडीमध्ये महिला शिक्षिकेनं 12 वीच्या विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं होतं. पीडित विद्यार्थी गुरुग्रामच्या शाळेत शिकायचा आणि आरोपी महिला त्याची क्लास टीचर होती. शिक्षिका विद्यार्थ्याला हॉटेलमध्ये घेऊन त्याच्यासोबत शारीरिक संबंध करायच्या.

    follow whatsapp