पुणे : 'तो' संशय व्यक्त केल्यानं कोमलची हत्या, सॉफ्टवेअर इंजिनिअरने क्रूरतेचा कळस गाठला

Pune Crime News : पुण्यातील हिंजवडीमध्ये प्रेमसंबंधातून सॉफ्टवेअर इंजिनिअर शुभम कालबांडे याने प्रेयसी कोमल डहाकेची हत्या केली. दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. संशय आणि वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे.

Pune Crime News

Pune Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पुणे : लिव्ह-इनमध्ये राहिले..,पण 'तो' संशय;

point

सॉफ्टवेअर इंजिनिअरने केली प्रेयसीची हत्या

Pune Crime News : पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून घडलेल्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने आपल्याच प्रेयसीची मारहाण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोमल डहाके असं मृत तरुणीचं नाव असून शुभम ज्ञानेश्वर कालबांडे असं आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे, शुभम आणि कोमल दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. तसेच त्यांच्या प्रेमसंबंधाला दोन्ही कुटुंबीयांची संमती होती. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रेमसंबंधात निर्माण झालेला संशय आणि त्यातून होणारे वाद अखेर एका तरुणीच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : सलग दुसऱ्यांदा पडळकरांचा गेम? सांगली भाजपमधूनच होतोय 'करेक्ट कार्यक्रम'?

दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर, पण शुभमवर प्रेयसीला यायचा संशय 

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम कालबांडे हा हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. तर कोमल डहाके ही विप्रो कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होती. दोघांचे प्रेमसंबंध होते आणि ते लग्नही करणार होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात संशय निर्माण झाला होता. कोमलला शुभमचे दुसऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला छोट्या स्वरूपात होणारे हे वाद हळूहळू वाढत गेले. घटनेच्या रात्रीही दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हिंसक घटनेत झाले.

हेही वाचा : Personal Finance: सोनं विकत घेण्याऐवजी सोन्यावर कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये लावा पैसे!

कोमलला इतकं मारलं की जीव गेला

आरोपानुसार, घटनेच्या रात्री झालेल्या वादातून शुभमने आपला राग अनावर झाल्याने कोमलला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने कोमलच्या डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कोमल गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे कोमलचा मृत्यू झाल्यानंतरही शुभम संपूर्ण रात्र तिच्या मृतदेहाजवळ बसून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने स्वतः पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 112 वर फोन केला. यावेळी त्याने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीजीमधील खोलीत कोमल निपचित अवस्थेत पडलेली होती. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी शुभम ज्ञानेश्वर कालबांडे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शुभम आणि कोमल यांच्या प्रेमसंबंधांना दोन्ही कुटुंबीयांची संमती होती. दोघेही लग्न करण्याच्या विचारात होते. मात्र, एकमेकांबद्दल निर्माण झालेला संशय आणि त्यातून सातत्याने होणारे वाद यामुळे त्यांच्या नात्याचा शेवट हत्येच्या घटनेत झाला. एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून घटनेशी संबंधित अधिक माहिती तपासातून समोर येणार आहे.