जळगाव : 80 लाखांची डील, डॉक्टरची क्रूर हत्या; मृतदेह धरणात फेकला?

मनीष जोग

24 Nov 2026 (अपडेटेड: 24 Nov 2026, 09:36 AM)

Dr Sanjay Teli Murder Case : 80 लाखांच्या जमीन व्यवहारातून कन्नड येथील डॉ. संजय तेली यांची हत्या झाल्याचा संशय आहे. मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकल्याची माहिती असून, संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Dr Sanjay Teli Murder Case

Dr Sanjay Teli Murder Case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जळगाव : 80 लाखांची डील

point

डॉक्टरची क्रूर हत्या; मृतदेह धरणात फेकला?

Dr Sanjay Teli Murder Case : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीये. जमिनीच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारातून कन्नड येथील डॉ. संजय तेली यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सुमारे 80 लाख रुपयांच्या जमीन व्यवहारातून निर्माण झालेल्या आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पाचोरा आणि कन्नड परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: सोनं विकत घेण्याऐवजी सोन्यावर कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये लावा पैसे!

प्राथमिक माहितीनुसार, जमीन व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाणीवरून संबंधितांमध्ये वाद झाला होता. या वादातून बाचाबाची झाल्यानंतर डॉ. संजय तेली यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादाचा शेवट डॉक्टरांच्या हत्येत झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आणि हत्येची परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे. 80 लाख रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख या प्रकरणात होत असून, या आर्थिक व्यवहाराशी संबंधित वादातूनच हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: कोर्टाने शिक्षा सुनावताच आरोपींनी मारली पाचव्या मजल्यावरून उडी, नागेशच्या मृत्यूने खळबळ

मृतदेह बहुळा धरणात फेकल्याचा संशय

हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डॉक्टरांचा मृतदेह पोत्यात भरून बिल्दी गावाजवळ असलेल्या बहुळा धरणात फेकल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या माहितीनंतर बहुळा धरण परिसरात मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला आहे. मृतदेह पोत्यात भरून धरणात फेकल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलिसांकडून धरण परिसरात शोधमोहीम राबवली जात असून, मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणातील पुढील तपासाला अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.

पाचोरा-कन्नड परिसरात खळबळ उडाली

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. जमीन व्यवहारातील आर्थिक वाद, डॉक्टरांची हत्या आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत. संशयितांची चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमके कारण, त्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि मृतदेह धरणात फेकण्यामागील घटनाक्रम याबाबत माहिती गोळा केली जात आहे. दरम्यान, डॉ. संजय तेली यांच्या हत्येच्या संशयामुळे पाचोरा-कन्नड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.