'आमच्या दोघांमध्ये अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी केला दूर', उद्धव ठाकरेंनी का केली अशी टीका?

मुंबई तक

वरळी डोम येथे आयोजित विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. पाहा उद्धव ठाकरे यावेळी नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंची बोचरी टीका (फोटो सौजन्य: Shiv Sena)
उद्धव ठाकरेंची बोचरी टीका (फोटो सौजन्य: Shiv Sena)
social share
google news

मुंबई: 'आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी...' असं थेट विधान करत शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. वरळी डोम येथे आयोजित विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. पण याचवेळी त्यांनी मनसे आणि शिवसेना UBT च्या युतीबाबत देखील स्पष्टपणे विधान केलं. 

पाहा उद्धव ठाकरे भाषणात नेमकं काय म्हणाले..

'अप्रतिम मांडणी राजने केलेली आहे. माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे की, सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की, आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे.' 

'ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची व्रजमूठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळे आहेत त्यात.. कोणाकोणाची नावं घ्यायची. महादेवराव बसले आहेत. महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिलं. काही वेळेला काही जानकर भी अनजान होते है... असं होतं..'

हे ही वाचा>> Raj-Uddhav Thackeray: 'जे बाळासाहेबांना, जमलं नाही.. ते फडणवीसना जमलं', राज ठाकरे असं का म्हणाले?

'पण एक गोष्ट नक्की की, आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी...' 

'आज मला कल्पना आहे की, अनेक बुवा, महाराज हे बिझी आहे. कोण लिंबं कापतंय, कोण टाचण्या मारतंय.. कोण गावी जाऊन अंगारे, धुपारे करत असतील.. रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो.. या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासमोर उभे ठाकलेलो आहोत.'

हे ही वाचा>> राज आणि उद्धव ठाकरेंचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे 'हे' खास फोटो

'भाषेवरून एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळात मी काय, राज काय आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलाय. वापरायचं आणि फेकून द्यायचं.. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत.' 

'आजपर्यंत वापर करून घेतलात.. अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं महाराष्ट्रात..' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपवर बरीच टीका केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp