Dharashiv : धाराशिव शहरातील पोस्ट ऑफिसजवळील एक धक्कादायक प्रकार घडला. न्यू क्लासिक जेंट्स पार्लर या सलूनमध्ये उधारीवर दाढी कटिंग करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मोठा वाद झाला. सलूनमधील ऋतुराज मोरे या युवकावर एका तरूणाने हल्ला केला. या हल्ल्यात ऋतुराज गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> गाड्या थांबल्या, टोळी उतरली आणि तिघांना बेदम मारलं, भर रस्त्यात थरार... बीडमध्ये पुन्हा मोठं प्रकरण
प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने दाढी कटिंगसाठी पैसे न देता उधारीवर काम करण्याची मागणी केली. मात्र, पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी उधारी नाकारल्यानं संतप्त झालेल्या आरोपीने ऋतुराज मोरे यांच्यावर हल्ला केला.
ऋतुराज यांने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी दुकानातच मारहाण केली. नंतर त्याला ओढत दुकानाबाहेर नेऊन पुन्हा बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ऋतुराज यांच्या डोक्याला 5 टाके पडले असून, इतरही गंभीर जखमा झाल्या आहेत.
हे ही वाचा >> "मला कमी कपडे घालणाऱ्या मुली...", भाजप मंत्र्यांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून अशा दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT
