बीड : माजलगावात दोन सख्ख्या बहिणींना जबरदस्तीने कारमधून नेण्याचा प्रयत्न, पण मुलींचा आवाज आला अन्...

Beed Crime News : फिर्यादी भाग्यश्री ज्ञानोबा हजारे (वय 24, रा. अंबाजोगाई) ही डी. फार्मसीची विद्यार्थिनी आपल्या बहिणीसह उपचारासाठी माजलगाव येथे आली होती. दुपारी 12:30 च्या सुमारास त्या हॉस्पिटलबाहेर उभ्या असताना, एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून आलेल्या तिघांनी दोघींनाही बळजबरीने गाडीत ओढले आणि दरवाजे लॉक केले. आरोपींनी गाडी धारूर रोडच्या दिशेने वेगाने पळवण्यास सुरुवात केली.

Beed Crime News

Beed Crime News

मुंबई तक

24 Feb 2026 (अपडेटेड: 24 Feb 2026, 04:49 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड: माजलगावात दोन सख्ख्या बहिणींना जबरदस्तीने कारमधून नेण्याचा प्रयत्न,

point

पण मुलींचा आवाज आला अन्... नागरिकांनी गाडी रोखून वाचवलं

बीड- योगेश काशिद: बीडच्या माजलगाव शहरातील संजीवनी हॉस्पिटलसमोरून दोन सख्ख्या बहिणींचे बळजबरीने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. पीडित मुलींच्या ओरडण्यामुळे आंबेडकर चौकातील सतर्क नागरिकांनी धावत्या गाडीला अडवून दोन्ही मुलींची सुटका केली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसांनी तत्परता दाखवत तीन तरुणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

फिर्यादी भाग्यश्री ज्ञानोबा हजारे (वय 24, रा. अंबाजोगाई) ही डी. फार्मसीची विद्यार्थिनी आपल्या बहिणीसह उपचारासाठी माजलगाव येथे आली होती. दुपारी 12:30 च्या सुमारास त्या हॉस्पिटलबाहेर उभ्या असताना, एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून आलेल्या तिघांनी दोघींनाही बळजबरीने गाडीत ओढले आणि दरवाजे लॉक केले. आरोपींनी गाडी धारूर रोडच्या दिशेने वेगाने पळवण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : पुणे : पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली, पण तरुणीने पळ काढताना इमारतीच्या खिडकीतून उडी मारली अन् जीव गेला

गाडी मुख्य रस्त्यावर असताना पीडित मुलीने मोठ्याने आरडाओरडा केला. हा आवाज ऐकताच आंबेडकर चौकातील नागरिकांनी प्रसंगावधान राखून गाडी समोरून अडवली. दरम्यान, मुलींचा मावसभाऊ सुरज भद्रे यानेही स्कूटीवरून गाडीचा पाठलाग करून चौक गाठला होता. संतप्त जमावाने गाडीतील तिन्ही तरुणांना पकडून चोप दिला आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी  दिनेश पुरुषोत्तम देवकते (रा. येल्डा, ता. अंबाजोगाई),रविंद्र विभीषण निळे (रा. चौथेवाडी, ता. अंबाजोगाई), मजरह सिकंदर सय्यद (रा. चौथेवाडी, ता. अंबाजोगाई) या तीन आरोपींवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५७/२०२६ अन्वये BNS कलम १३७ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे माजलगाव शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, नागरिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळे एका मोठ्या अनर्थाला वेळीच रोखण्यात यश आले, असे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पुणे : पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली, पण तरुणीने पळ काढताना इमारतीच्या खिडकीतून उडी मारली अन् जीव गेला

    follow whatsapp