Maharashtra Weather : राज्यात कुठे ऊन तर कुठे अवकाळी पावसाची शक्यता, IMD विभागाचा अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात मिश्र हवामानाची स्थिती जाणवणार आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह गडगडाटाची शक्यता आहे. या विभागांसाठी IMD विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात 24 जानेवारी रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 24 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात मिश्र हवामानाची स्थिती

point

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या

Maharashtra Weather : राज्यात मिश्र हवामानाची स्थिती जाणवणार आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह गडगडाटाची शक्यता आहे. या विभागांसाठी IMD विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात 24 जानेवारी रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : रश्मिका- विजय देवरकोंडा बोहल्यावर चढणार, विवाह सोहळ्याला दिलं 'ते' स्पेशल नाव

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज

IMD विभागानुसार, पुढील 24 तासांत हवामानात फारसा बदल होणार नाही अशी शक्यता वर्तवली आहे. किमान तापमानातही फारसा बदल अपेक्षित नाही, परंतु राज्याच्या काही भागांत उष्णतेची सुरुवात होण्याचे संकेत आहेत.

कोकण विभागात मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. या एकूण जिल्ह्यामध्ये कोरडं हवामान राहील. तसेच हवामानात फार मोठा फरक जाणवणार नाही. 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पुढील दोन दिवस चिंतेचे असण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसेच बीड, परभणी या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. 

विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णता तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता

दरम्यान विदर्भात सर्वाधिक उष्णता जाणवेल, अशातच पुढील काही तास महत्त्वाचे असतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाची दाट शक्यता असेल. 

हे ही वाचा : मुलाचं लग्न तोंडावर असताना 37 वर्षीय मामी 21 वर्षीय भाच्यासोबत गेली पळून, नवरा आठवणीत झाला वेडा

चंद्रपूर आणि गडचिरोलीत विजांच्या कडकडाट आणि काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. यवतमाळ जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. 

    follow whatsapp