धाराशिव : चार दिवसांपूर्वी साखरपुडा, मेहंदीचा रंग उतरण्याआधीच नवरदेव अन् नवरी मुलीवर काळाचा घाला

मुंबई तक

22 Feb 2026 (अपडेटेड: 22 Feb 2026, 06:52 PM)

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील रत्नापूर पाटीजवळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या वधू आणि वरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे. मृत्यू झालेल्या वधू वरांची ओळख पटली आहे. 

Dharashiv news

Dharashiv news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

विवाहापूर्वी वधू आणि वरावर काळाचा घाला

point

 धोकादायक वळणावर भीषण अपघात

Dharashiv News : गणेश जाधव - धाराशिव जिल्ह्यातील रत्नापूर पाटीजवळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या वधू वरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे. मृत्यू झालेल्या वधू वरांची ओळख पटली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अक्षता पडायला काहीच तास बाकी होते, दोघींनी संपवलं जीवन, मामाने केला धक्कादायक आरोप

विवाहापूर्वी वधू आणि वरावर काळाचा घाला

अक्षय रामभाऊ शिनगारे (वय 25) आणि नवरी मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय 23) अशी मृत्यू झालेल्या वधू-वरांची नावे आहेत. गेल्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी मांजरसुंबा येथील कन्हैया मंगल कार्यालयात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. विवाहाची तयारी सुरु असतानाच काळाने घाला घातला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघात कसा झाला? 

घडलेल्या घटनेनुसार, अक्षया चव्हाण हिची लातूर येथे महापरोषणाची परीक्षा असल्याने ती रविवारी पहाटे वाशी येथून Nexon (क्र. MH 25 BF 5064) ही कार घेऊन निघाली होती. कारमध्ये अक्षय रामभाऊ शिनगारे आणि चालक अक्षय यादव सिरसट (वय 22) हे दोघे होते.

धोकादायक वळणावर भीषण अपघात

रत्नापूर पाटीजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भारधाव कार थेट येडशी टोल नाका येथील कमानीवर आदळली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात अक्षय आणि अक्षया यांचा जागीच मृ्त्यू झाला, तर चालक गंभीरपणे जखमी झाल्याचे वृत्त आहे.  

संबंधित घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या चालकाला 108 रुग्णावाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. 

हे ही वाचा : मामीसह तिच्या मुलीला भाच्याने गळा दाबून संपवलं, मृतदेह बेडमध्ये भरून ठेवला

चार दिवसांपूर्वी साखरपुड्याता आनंद साजरी करणाऱ्या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली. दरम्यान या भीषण अपघाताचे नेमकं कारण समोर आले नाही.