मामीसह तिच्या मुलीला भाच्याने गळा दाबून संपवलं, मृतदेह बेडमध्ये भरून ठेवला

मुंबई तक

Crime News : भाच्याने मामीसह तिच्या मुलीची निर्घृण हत्या केली. या घटनेचा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही हत्या या भाच्याने केल्या आहेत. संबंधित हल्लेखोर फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस त्याच्या शोध घेत असून घटनेचा तपास सुरु आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

मामीसह मुलीची भाच्याने केली हत्या  

point

मृतदेह बेडमध्ये भरून ठेवला 

Crime News : भाच्याने मामीसह तिच्या मुलीची निर्घृण हत्या केली. या घटनेचा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही हत्या या भाच्याने केल्या आहेत. संबंधित हल्लेखोर फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस त्याच्या शोध घेत असून घटनेचा तपास सुरु आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हे ही वाचा : अक्षता पडायला काहीच तास बाकी होते, दोघींनी संपवलं जीवन, मामाने केला धक्कादायक आरोप

मामीसह मुलीची भाच्याने गळा दाबून केली हत्या 

दिल्लीतील सरिता विहार पोलीस ठाणे परिसरात पुतण्याने मामी आणि तिच्या धाकट्या मुलीची हत्या केली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. संबंधित तरुणाने हत्येचं कांड करून घटनास्थळावरून पळ काढल्याचे वृत्त आहे.

मुलीसह मामीचा मृतदेह बेडमध्ये भरून ठेवला 

महिलेचा पती कामावरून घरी परतताना शेजाऱ्यांना या घटनेची माहिती समजली असता, पत्नी आणि तिच्या मुलीचा मृतदेह हा बेडमध्ये भरून ठेवला होता. मृताच्या पतीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, त्यांनी प्रकरणाचा तपास सुरु केला असून आरोपीचा शोध सुरु आहे. 

महिला ही तिचा पती सुदर्शन, भाचा इतर तीन मुलींसह राहत होती. घटनेवेळी कुटुंबातील दोन मुली शाळेत होत्या, त्याचदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. मृतांची ओळख ज्योती (वय 35) आणि तिची सहा वर्षांची मुलगी अशी आहे. शवविच्छेदन केल्यानंतर दोघींच्याही रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या केल्याची माहिती समोर आली. 

हे वाचलं का?