अक्षता पडायला काहीच तास बाकी होते, दोघींनी संपवलं जीवन, मामाने केला धक्कादायक आरोप

मुंबई तक

Crime news : विवाहादिवशी दोन बहि‍णींनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं. या घटनेनं आनंदाच्या समारंभात विरजन निर्माण झालं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलींनी विषारी पदार्थ सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आनंदाचं वातावरण दु:खात बदललं

point

दाजींच्या भावाने लग्नासाठी दबाव आणला, मृतांच्या मामाचा गंभीर आरोप

Crime news : जोधपूरच्या मनाई गावात लग्न समारंभा दिवशीच अक्रीत घडलं. विवाहाच्या काही तासांपूर्वी दोन बहि‍णींनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं. या घटनेनं आनंदाच्या समारंभात विरजन निर्माण झालं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलींनी विषारी पदार्थ सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.     

हे ही वाचा : अकोल्यात बारावी बोर्डाच्या परिक्षा केंद्रावर विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात जाऊन सोडवला पेपर

आनंदाचं वातावरण दु:खात बदललं

शोभा आणि विमला यांचा शनिवारी विवाह होणार होता, पण त्याआधीच काही तास शुक्रवारी त्यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते, त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनं आनंदाचं वातावरण क्षणार्धात दु:खात बदललं. 

एडीसीपी म्हणाले की, त्यांच्या घरी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत लग्नउत्सव समारंभ सुरु होता, पण या घटनेनंतर कुटुंबियांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात नेले. उपचार सुरु असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषत केले. या घटनेनंतर दोघींच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली होती, अशी माहिती दिली. 

संबंधित घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, बहिणीचा मृत्यू हा विषारी पदार्थांचे सेवन केल्याने झाला असावा, अशी शक्यता आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. या प्रकरणी तरुणींच्या मामाने एक धक्कादायक आरोप केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp