झटपट ऑनलाइन कर्जाच्या नादात फसले, 5 लाख लोकांना 200 कोटींचा चुना, नेमकं प्रकरण काय?

योगेश पांडे

तात्काळ ऑनलाईन कर्ज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे. मस्त मनी ॲपच्या माध्यमातून लाखो लोकांना गंडा घालण्यात आला.

ADVERTISEMENT

Instant Loan Fraud
Instant Loan Fraud
Google CTA

बातम्या हायलाइट

point

झटपट ऑनलाइन कर्जाच्या नादात फसले

point

5 लाख लोकांना 200 कोटींचा चुना

point

नेमकं प्रकरण काय?

Instant Loan Fraud : तात्काळ ऑनलाईन कर्ज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. 'मस्त मनी' नावाच्या मोबाईल ॲपद्वारे देशभरातील सुमारे 5 लाख लोकांची तब्बल 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने अत्यंत चाणाक्षपणे तपास करत मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. कामिल सिद्दीकी वल्द हामिद सिद्दीकी (रा. काजीपुरा, बैरसिया, भोपाळ) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून त्याने या फसवणुकीसाठी तांत्रिक जाळे विणले होते.

ॲप डाऊनलोड केले अन् फसले

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, आरोपी कामिलने 'मस्त मनी' हे लोन ॲप विकसित केले होते. त्यानंतर सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर आकर्षक जाहिराती देऊन नागरिकांना अवघ्या 15 हजार रुपयांचे तात्काळ ऑनलाईन कर्ज देण्याचे आमिष दाखवण्यात आले. कर्ज घेण्याच्या घाईत आणि जाहिरातींच्या भुलथापांना बळी पडून देशभरातील लाखो गरजू नागरिकांनी हे धोकादायक ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आणि कर्जासाठी अर्ज केले.

हे ही वाचा : अंकशास्त्र आणि राजकारण्यांचं भवितव्य, पाहा ठाकरे, शिंदे आणि फडणवीसांचं पुढे काय होणार?

कर्ज देऊन ब्लॅकमेल

तपासानुसार, पीडित नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करताच त्यांच्या मोबाईलमधील वैयक्तिक डेटा, गॅलरी, फोटो आणि संपूर्ण संपर्क सूचीचा (कॉन्टॅक्ट लिस्ट) ताबा आरोपीच्या टोळीकडे जात असे. एकदा का नियंत्रण हाती आले की, 15 हजार रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात व्याजासह 25 हजार ते 50 हजार रुपयांची बेकायदेशीर वसुली करण्यासाठी ग्राहकांना ब्लॅकमेल केले जायचे. जर एखाद्याने पैसे देण्यास नकार दिला, तर त्याचे खाजगी फोटो आणि माहिती सोशल मीडिया व त्याच्याच परिचितांना पाठवून ती सार्वजनिक करण्याची धमकी दिली जात होती.

हे ही वाचा : Personal Finance: स्वतःचं नवं घर घेण्यासाठी 'या' फॉर्म्युल्याने ठरवा डाऊन पेमेंटचा जबरा प्लॅन

'असं' बाहेर आलं प्रकरण

नागपूरमधील दोन सुजाण नागरिकांनी या जाचाला कंटाळून सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले आणि थेट भोपाळ गाठून मुख्य आरोपी कामिल सिद्दीकी याला बेड्या ठोकल्या. या आंतरराज्यीय रॅकेटचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरले आहेत, या टोळीत आणखी किती जणांचा समावेश आहे आणि ठगीच्या पैशांचे व्यवहार कशा प्रकारे करण्यात आले, याचा सखोल तपास आता नागपूर पोलीस करत आहेत.
 

हे वाचलं का?