विवाहित प्रेयसीच्या प्रेमात वेडा झाला, सोन्यासारख्या बायकोसमोरच भयानक कांड

मुंबई तक

प्रेमात वेडा झालेला माणूस कोणतं पाऊल उचलेल काही सांगता येत नाही. तेलंगणातील या घटनेत बायको, नवरा अन् त्याची प्रेयसी एकाच रेल्वेतून प्रवास करत होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

विवाहित प्रेयसीच्या प्रेमात वेडा झाला

point

सोन्यासारख्या बायकोसमोरच भयानक कांड

Crime News : प्रेमात वेडा झालेला माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचा प्रत्यय आणून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  'शबरी एक्सप्रेस'मध्ये ही घटना घडली. एका पतीने आपल्या पत्नीसोबत गावी परतत असताना, चालत्या ट्रेनमध्येच आपल्या विवाहीत प्रेयसीच्या साथीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. एकमेकांपासून दूर होण्याची भीती सहन न झाल्याने या प्रेमी युगुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. या थरारक घटनेमुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

विवाहित महिलेसोबत लिव्ह-इनमध्ये

या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी अतिशय नाट्यमय आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील छपरा गावचा रहिवासी असलेला सिरिश याचे आपल्याच गावातील नीलावेनी नावाच्या एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. हे दोघेही घरदार सोडून कोइंबतूर येथे एकत्र लिव्ह-इनमध्ये राहत होते. दरम्यान, आपला पती दुसऱ्या शहरात अनैतिक संबंधांमध्ये अडकल्याची माहिती सिरिशची पत्नी सुलोचना हिला मिळाली. तिने तात्काळ कोइंबतूर गाठले आणि पतीची समजूत काढत त्याला आणि त्याच्या प्रेयसीला पुन्हा आपल्या गावी छपरा येथे परतण्यासाठी तयार केले.

हे ही वाचा : झटपट ऑनलाइन कर्जाच्या नादात फसले, 5 लाख लोकांना 200 कोटींचा चुना, नेमकं प्रकरण काय?

एकमेकांपासून ताटातूट होऊ नये यासाठी...

पत्नीच्या शब्दाला मान देऊन दोघेही तिच्यासोबत शबरी एक्सप्रेसने गावाकडे येण्यास निघाले खरे, मात्र सुलोचनाच्या पतीला आणि त्याच्या प्रेयसीला एकमेकांपासून दूर जाणे कदापि मान्य नव्हते. ट्रेन जसजशी पुढे सरकत होती, तसतशी एकमेकांपासून ताटातूट होण्याची भीती त्यांच्या मनात घर करत होती. याच मानसिकतेतून, ट्रेन सिकंदराबाद रेल्वे स्टेशनच्या जवळ येत असताना, सिरिश आणि नीलावेनी यांनी पत्नीची नजर चुकवून चालत्या ट्रेनमध्येच काहीतरी विषारी पदार्थ प्राशन केला. काही वेळातच दोघेही डब्यामध्ये कोसळल्याचे पाहून इतर प्रवाशांचे धाबे दणाणले.

हे ही वाचा : मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रिमचा परवाना रद्द, तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर मोठी कारवाई

प्रेमातील वेडेपणा

प्रवाशांनी या घटनेची माहिती तत्परतेने रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. ट्रेन सिकंदराबादला पोहोचताच शासकीय रेल्वे पोलिसांनी (GRP) तातडीने चक्र फिरवून दोघांनाही उपचारासाठी हैदराबादच्या गांधी रुग्णालयात दाखल केले. सध्या या रुग्णालयातील डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याप्रकरणी सिकंदराबाद रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कौटुंबिक वादातून आणि प्रेमातील वेडेपणातून घडलेल्या या गंभीर घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?