मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रिमचा परवाना रद्द, तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर मोठी कारवाई

मुंबई तक

tukaram mundhe fda cancels rustom ice cream parlour licence : तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएने चर्चगेटमधील रुस्तम आइसक्रीम पार्लरवर कारवाई करत परवाना रद्द केला. स्वच्छतेतील त्रुटी आणि कालबाह्य साहित्य आढळल्याने पार्लर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

Tukaram Mundhe
Tukaram Mundhe
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रिमचा परवाना रद्द

point

तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर मोठी कारवाई

tukaram mundhe fda cancels rustom ice cream parlour licence , मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या 'सेफ फुड, सेफ महाराष्ट्र' अभियानांतर्गत मुंबईतील चर्चगेट परिसरातील प्रसिद्ध रुस्तम आइसक्रीम पार्लरवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे कथित उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर एफडीएने या आइसक्रीम पार्लरचा परवाना रद्द केला आहे. तसेच या आस्थापनातून घेतलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल येईपर्यंत पार्लर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर अस्मानी संकट कायमच, 'या' जिल्ह्यांचं काही खरं नाही

परिसरात उंदीर आणि माशा आढळून आल्या

पीटीआयच्या वृत्तानुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत आइसक्रीम पार्लरमध्ये स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळल्या. पाहणीदरम्यान पार्लरच्या परिसरात उंदीर आणि माशा आढळून आल्या. या निरीक्षणात अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने संबंधित आस्थापनाचा परवाना तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईनंतर संबंधित आस्थापनातून नमुने गोळा करून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा : Personal Finance: स्वतःचं नवं घर घेण्यासाठी 'या' फॉर्म्युल्याने ठरवा डाऊन पेमेंटचा जबरा प्लॅन

हे वाचलं का?